नाशिक- सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने त्र्यंबकेश्वरमध्ये प्राधान्याने हाती घ्यायच्या कामांचा प्रस्ताव मंगळवारी (ता. २२) शासनाकडे सादर केला जाणार आहे. तसेच राज्य मंत्रिमंडळाची बैठक २९ एप्रिलला चोंढी (जि. अहिल्यानगर) येथे आयोजित करण्यात आली आहे. बैठकीत त्र्यंबकेश्वर विकास आराखड्याचे सादरीकरण केले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.