Nashik Agriculture News : पेरणी योग्य पावसानंतरच कपाशीची लागवड करा : गोकुळ अहिरे

Cotton News
Cotton Newsesakal

Nashik News : उपविभागातील सटाणा, मालेगाव आणि नांदगाव या तालुक्यात मोठया प्रमाणात कापसाची लागवड केली जाते.

लांबलेला कापूस हंगाम व कापूस पीक शेतात राहिल्यामुळे किडीचा जीवनक्रम अखंडित राहण्याची शक्यता असल्यामुळे चालू खरीप हंगामात बोंड अळीचा प्रार्दुभाव होण्याची शक्यता आहे. (Sowing Plant cotton only after proper rains Agriculture Officer Gokul Ahire appeals nashik agriculture news)

त्यामुळे कापूस पिकावरील गुलाबी बोंडअळीचा प्रार्दुभाव नियंत्रणात ठेवणे व प्रार्दुभाव टाळण्याच्या दृष्टीने विविध उपाययोजना करण्यासाठी पेरणीयोग्य पाऊस झाल्यावरच कापूस पिकाची लागवड करावी, असे आवाहन उपविभागीय कृषी अधिकारी गोकूळ आहिरे यांनी केले.

यासाठी गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी उन्हाळ्यामध्ये एप्रिल व मे महिन्यात जमिनीची खोल नांगरटी करावी.

कापूस पिकाची पूर्वहंगामी मे महिन्यातील लागवड टाळावी. गुलाबी बोंडअळीचे जीवनचक्र खंडीत करण्यासाठी शेत ५ ते ६ महिने कापूस विरहित ठेवणे आवश्यक असल्याने गुलाबी बोंडअळी डिसेंबर नंतर खाद्य न मिळाल्यास बोंडअळी सुप्त अवस्थेत जाते.

परंतु फरदडमुळे किडीचे जीव जीवनचक्र अखंडीत चालू राहण्यास मदत होऊन पुढील हंगामात किडीचा प्रादुर्भाव होतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी फरदड घेणे टाळावे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Cotton News
Agriculture News : साडेपाच लाख हेक्टरवर होणार कपाशीचा पेरा; खरिपासाठी शेतकरीराजा होतोय सज्ज

कापसाच्या पऱ्हाट्या बांधावर न ठेवता त्या रोटाव्हेटर किंवा थ्रेडरद्वारे जमिनीत गाडाव्यात अथवा जाळाव्यात. शेत व बांध स्वच्छ ठेवावेत.

कापसाची वेचणी झाल्यानंतर हंगामाच्या शेवटी शेतात शेळ्या, मेंढ्या व इतर जनावरे चरणासाठी सोडाव्यात. त्यामुळे गुलाबी बोंडअळीचा जीवनक्रम खंडीत होऊन पुढील हंगामात प्रार्दुभाव कमी होण्यास मदत होते.

शेतकऱ्यांनी विविध संकरित वाणांची लागवड न करता गावनिहाय एकाच वाणाची व एकाच वेळी लागवड करावी. कमी कालावधीत पक्व होणाऱ्या बीटी कापूस अथवा सरळ वाणांची वेळेतच जून महिन्यात जमिनीत पुरेसा ओलावा आल्यानंतर पेरणी करावी.

किडीच्या जीवनक्रमात अडथळा निर्माण करण्यासाठी पिकाची फेरपालट करावी. कापूस पिकाच्या सभोवती नॉन बीटी कापसाची लागवड करावी. नत्र खताचा वापर जास्त झाल्यास पिकाची कायिक वाढ होऊन गुलाबी बोंड अळीचा प्रार्दुभाव वाढतो.

त्यामुळे जास्तीच्या नत्र खताचा वापर न करता मृद परिक्षण करून त्यांच्या आधारावर खतांच्या मात्रेचा अवलंब करावा. याप्रमाणे उपाययोजना व व्यवस्थापन करून कापूस पिकावरील गुलाबी बोंडअळी प्रादुर्भाव नियंत्रणात ठेवता येईल.

Cotton News
Cotton : एक जूनपूर्वी शेतकऱ्यांनी कापूस लागवड करू नये; बोंडअळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कृषी विभागाचे आवाहन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com