Nashik News : मकरसंक्रांत पर्वकाळात दानाचे विशेष महत्त्व

Makar Sankranti News
Makar Sankranti Newsesakal

नाशिक : पौष कृष्‍ण सप्तमीला शनिवारी (ता. १४) रात्री ८. ४४ वाजता सूर्य मकर राशीत प्रवेश करत आहे. त्यामुळे या वर्षी संक्रांत रविवारी (ता. १५) सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत आहे. संक्रांतीला सुवासिनी सुगडाची पूजा करतात.

तसेच, संक्रांतीच्या पर्वकाळात केलेल्‍या दानाला विशेष महत्त्व आहे. संक्रांतीचे वाहन वाघ आहे व उपवाहन घोडा आहे. तिने पिवळे वस्त्र धारण केले असून हातात गदा घेतलेली आहे. केशराचा टिळा लावलेला आहे.

मकरसंक्रांत एकमेव सण १४ वा १५ तारखेलाच साजरा होतो. मकर राशीतून सूर्य दुसऱ्या राशीत प्रवेश वा संक्रमण करतो, यालाच मकरसंक्रांत असे म्‍हणतात. (Special importance of donation during Makar Sankranti festival Nashik News)

Makar Sankranti News
Nashik News :Smart Cityच्या कामांमुळे मे पर्यंत वाहतूक मार्गात बदल

हिंदू संस्‍कृतीतील एकमेव असा सण आहे जो त्‍याच तारखेला येतो, याचे कारण म्‍हणजे तो सूर्याच्या स्‍थानावर आधारलेला आहे. सोलर सायकल ही दर आठ वर्षांनी एकदा बदलते. अशा वेळेस हा सण १५ जानेवारीला येतो. २०१६ ला संक्रांत १५ जानेवारीला होती. मकरसंक्रांती २०२३ च्या संदर्भात एक मान्यता आहे, की या दिवशी भगवान सूर्य आपला पुत्र शनी देवाच्या दर्शनासाठी गेले होते.

या भेटीत ते सर्व मतभेद विसरून गेले होते. तक्रारी विसरून या दिवशी नातेसंबंध सुधारतात. ज्योतिषशास्त्रानुसार २०२३ सालची मकरसंक्रांत आणखी खास असेल, कारण सूर्य आणि शनी ३० वर्षांनंतर मकर राशीत भेटतील. सुगड म्हणजे शेतमालांनी भरलेला घट. आपला देश हा कृषिप्रधान देश आहे. त्यामध्ये नवीन मालाची पूजा केली जाते.

सुगड देवाजवळ, तुळशीजवळ ठेवला जातो. बाकी सुगडाचे वाण सुवासिनी एकमेकींना देतात. सुगडवर फुले, हळदी- कुंकू वाहिली जाते आणि दिवा लावून नमस्कार केला जातो आणि अखंड सौभाग्य राहो, अशी कामना केली जाते. संक्रांतीच्या दिवशी तिळगूळ लाडू खाल्ले जातात, तिळगुळ वाटले जातात.

सूर्यकुमार...भारतीय क्रिकेट मधला 'लंबी रेस का...'

Makar Sankranti News
Makar Sankranti 2023 : यंदाची मकर संक्रांत 'या' राशींचं नशीब पालटणार

पर्वकाळ/पुण्यकाळ

सकाळी ८. ३८ ते १२. ४८ दुपारी

२. ११ ते ३. ३४ दुपारपर्यंत

कालावधी : सकाळी ४ तास १० मिनिटे

दुपारी १ तास २३ मिनिटे

पर्वकाळात स्नान, दानधर्म, नामस्मरण असे पुण्य कृत्य केले असता फल शतपट होते. नवे भांडे, गाईला घास, अन्न, तीळपात्र, गूळ, सोने, भूमी, गाय, वस्त्र, घोडा, इत्यादी यथाशक्ती दान करावे.

Makar Sankranti News
Makar Sankranti : चिमुरड्याच्या संक्रांतीसाठी करा अशी तयारी अन् घरच्याघरी करा फोटोशूट

संक्रांतीची पूजाविधी

मकरसंक्रांती दिवशी भगवान सूर्याचे उत्तरायणाचा काळ. सूर्यदेवास मकर संक्रांतीच्या दिवशी अर्ध्यच्या वेळेस जल, लाल पुष्प, वस्त्र, गहू, सुपारी इत्यादी अर्पण करावे. सूर्य आणि शनिदेवाच्या उपासनेसह गायत्री मंत्र आणि सूर्य गायत्री मंत्राचा जप केला जातो.

सूर्यदेव गायत्री मंत्र : ऊँ आदित्याय विदमहे दिवाकराय धीमहि तन्नो सूर्यः प्रचोदयत।।

शनी महाराज गायत्री मंत्र : ॐ भग-भवाय विदमहे मृत्यु-रूपाय धीमहि तन्नो शनिः प्रचोदयात् ॥

Makar Sankranti News
Makar Sankranti 2023 : संक्रातीच्या पार्श्वभूमीवर मोहोळची बाजारपेठ गजबजली महिलांची खरेदीसाठी झुंबड

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com