शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात घालवू नका - डॉ. भारती पवार

Union Minister of State for Health and Family Welfare Dr. Bharti Pawar
Union Minister of State for Health and Family Welfare Dr. Bharti Pawaresakal

नाशिक : शेतातील उभी पिके जर विजेअभावी पाणी न मिळाल्याने जळाली तर शेतकरी मोठ्या संकटात सापडून उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. ह्या विषयीच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या आणि ह्यातून योग्य मार्ग काढण्यासाठी वीज मंडळांच्या नाशिक जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. वीज वितरण महामंडळाच्या जिल्ह्यातील सर्व अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत तक्रार निवारण बैठक केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या उपस्थितीत संपन्न झाली.

सक्तीच्या वीजतोडणीने शेतकरी त्रस्त

सध्या वितरण महामंडळाची सक्तीची बीजबिल मोहीम सुरू आहे. सर्वत्र सक्तीने शेतकऱ्यांकडून वीजबिल वसुली सुरू असून वीजबिल न भरलेल्या शेतकऱ्यांच्या डी पी कट केल्या जाताय. परिणामी शेतकऱ्यांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागतोय. शेतात पिके उभी असतांना विजेअभावी त्यांना पाणी देता येत नसल्याने शेतपिके धोक्यात आली आहे. आधीच आस्मानी संकटाने त्रस्त असलेला शेतकरी आता सक्तीच्या वीजतोडणीने त्रस्त झाला आहे.

Union Minister of State for Health and Family Welfare Dr. Bharti Pawar
ओझर विमानतळाला ‘हज टर्मिनल’चा दर्जा

शेतकऱ्यांची पिळवणूक त्वरित थांबवावी

"दिवाळीचा सण सुरू आहे, बळीराजाची दिवाळी अंधारात घालवू नका .शेतकऱ्यांना उत्पन्न मिळाले तर शेतकरी विजबिले भरू शकतो. घरातल्या विजबिलाची रक्कम मिटरचे युनिट तपासून दिले जाते, मात्र शेतीचे वीजबिल हे अंदाजे दिले जाते ही शेतकऱ्यांची पिळवणूक असून त्यांच्यावर होणारा अन्याय त्वरित थांबवावा" असे प्रतिपादन डॉ. भारती पवार यांनी तक्रार निवारण बैठकीत केले.

अनेक ग्रामपंचायती अंधारात

वीज थकीत असल्याने अनेक ग्रामपंचायतींच्या स्ट्रीट लाईटचा विद्युतपुरवठा खंडित केल्याने त्या अंधारात आहे. डी पी कनेक्शन तोडू नका, नादुरूस्त असलेल्या डी पी लवकर दुरुस्त करून बसवा, जिथे जिथे समस्या येत असतील त्या- त्या ठिकाणी जाऊन त्या सोडवा. अनेक शेतकऱ्यांनी आगाऊ रक्कम भरून नवीन डी पी साठी मागणी केली असून त्यांना लवकरात लवकर डी पी उपलब्ध करून देण्याच्या सूचना केली.

Union Minister of State for Health and Family Welfare Dr. Bharti Pawar
Nashik | दिवाळीत Good News! हजारो बेरोजगारांना मिळणार नोकऱ्या

"बळीराजा हा खूप सहनशील आणि संवेदनशील असून तुम्ही आता त्यांचा अंत बघू नका" असेही डॉ. भारती पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सुनावले. सदर बैठकीस नाशिक जिल्हाध्यक्ष केदानाना आहेर, ज्ञानदेव पडळकर - अधीक्षक अभियंता नाशिक, सानप - अधीक्षक अभियंता मालेगाव, कार्यकारी अभियंता डोंगरे, आव्हाड, तडवी, भामरे, सुनील बच्छाव, शंकरराव वाघ, एन डी गावित, सुवर्णताई जगताप, भागवत बाबा बोरस्ते, यतीनजी कदम, दीपक खैरनार, बापू पाटील, सतीश मोरे, अरुण माऊली, पंकज शेवाळे, संजय शेवाळे, नरेंद्र जाधव, मनोज शिंदे, रमेश थोरात, भाऊसाहेब काडभाने, दीपक देसले, संजय वाघ, जगन अप्पा पाटील, विलास बापू मत्सगार, सारिका डेरले, डॉ. प्रशांत भदाणे, श्याम मुरकुटे, योगेश तिडके, आदेश सानप, यांच्यासह विज वितरण महामंडळाचे सर्व अधिकारी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com