Nashik News : सावधान! तुमची मुले शाळेत सुरक्षित जातात का? शालेय वाहनांमधून कोंबून प्रवास

students overloading in school bus and van nashik news
students overloading in school bus and van nashik newsesakal

Nashik News : शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या रिक्षा, बस अन् व्हॅन एक समीकरण झाले आहे. अगदी बालवाडी ते महाविद्यालयातील विद्यार्थीदेखील शिक्षण संस्थांच्या, तसेच काही खासगी शालेय रिक्षा, बस आणि व्हॅनने प्रवास करत असतात.

परंतु सध्या अनेक शालेय बस आणि व्हॅनमध्ये विद्यार्थी कोंबत असल्याचे चित्र बघायला मिळत आहे. स्कूल बस अतिशय वेगाने चालवत असल्याचे निदर्शनास येत आहे.

याकडे प्रादेशिक परिवहन विभाग लक्ष देणार का, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. (students overloading in school bus and van nashik news)

शाळेत आपल्या पाल्याला घेऊन जाण्यासाठी पालक महिन्याकाठी पाचशे ते हजार रुपये मोजतात. पण आपले पाल्य शाळेत जाताना सुरक्षित जातात आणि येतात का हे पालक बघतात का, हाही प्रश्न पडतो.

शालेय बस आणि व्हॅनसाठी प्रादेशिक परिवहन विभागाने (आरटीओ) नियमावली घालून दिली आहे. त्याचे पालन होते की नाही, याकडे प्रादेशिक परिवहन विभागाचे लक्ष आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. आजची परिस्थिती बघितली तर शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या

प्रत्येक वाहनात विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाण कोंबाकोंबी होताना दिसत आहे. प्रत्येक वाहनाच्या क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी वाहनात बसविले जातात. हे सर्व पालकांनाही दिसत आहे. परंतु पालकांना आपल्या पाल्याला शाळेत नेण्यास व आणण्यास वेळ नसल्याने ते सर्व उघड्या डोळ्याने बघत असतात.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

students overloading in school bus and van nashik news
Children Health: लहान मुलांचे पोट सतत खराब होते? मग ‘हे’ उपाय नक्की ट्राय करून बघा

शालेय विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या बस अन् व्हॅनवरील चालकांना प्रशिक्षण देणे गरजेचे असून, त्यांचे वेळोवेळी प्रबोधन प्रादेशिक परिवहन विभागाकडून व्हायला हवे. वाहनात किती विद्यार्थ्यांची वाहतूक केली पाहिजे, वाहनाची वेगमर्यादा किती हवी यासाठी चालकांना मार्गदर्शन गरजेचे झाले आहे.

पालकांनी द्यावे लक्ष

पालकांनीही जबाबदारीने आपला पाल्य ज्या बस, व्हॅनमधून जातो तो चालक कशाप्रकारे वाहन चालवतो यासाठी पाल्यांना विचारणा करणे गरजेचे आहे. शाळा तसेच महाविद्यालयांकडून वेळोवेळी शालेय बस, व्हॅनच्या चालकांना मार्गदर्शन करण्यासाठी प्रयत्न व्हायला हवा.

शालेय वाहतूक बससेवा देणारे बस, व्हॅन, रिक्षा यांची महिन्यात किंवा एकदा तरी तपासणी मोहीम घ्यावी. जेणेकरून शालेय वाहतूक करणारे ओव्हर स्पीड गाडी चालवतात का, क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी वाहतूक करताय का, याकडे कायमस्वरूपी लक्ष राहील व तसा चालकांमध्ये एक धाक निर्माण होईल.

students overloading in school bus and van nashik news
NMC School Teacher : मनपा शिक्षकांना ड्रेसकोडसह मोबाईल वापरावर बंदी? काही दिवसात अंतिम सूचना

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com