Nashik News: प्रकल्पग्रस्तांच्या लढ्याला यश! उच्च न्यायालयाचा प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या बाजूने निकाल

 Court Order
Court Order esakal

सिडको : ४२ वर्षांपासून सिडकोसोबत सुरू असलेल्या प्रकल्पग्रस्तांच्या लढ्याला यश आले असून उच्च न्यायालयाने प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या बाजूने निकाल देत दोन महिन्यांच्या आत त्यांचे पैसे व्याजासह परत देण्याचे आदेशित केल्याची माहिती ॲड. अनिल अहुजा यांनी पत्रकार परिषदेत दिली. (Success in fight of project victims High Court verdict in favor of project affected farmers Nashik News)

(लोकल ते ग्लोबल लेटेस्ट अपडेट मिळवा सकाळच्या व्हॉट्सअप चॅनेलवर फक्त एका क्लिकमध्ये)

सिडको प्रशासनाने १९८१ ला मोरवाडी, उंटवाडीसह कामटवाडे गावात भूसंपादन केले होते. तेव्हापासून जागेच्या भावाबद्दल न्यायालयीन लढाई सुरू होत्या. त्यानंतर न्यायालयाने सिडकोला दर निश्चित केला होता.

मात्र सिडकोनेदेखील न्यायालयात धाव घेतल्याने शेतकऱ्यांच्या मोबदल्याचा प्रश्न अद्यापही प्रलंबित होता. यावर १७ शेतकऱ्यांनी उच्च न्यायालयात धाव घेत दाद मागितली होती.

यावरून उच्च न्यायालयाने सदर १७ प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देत त्यांच्या बाजूने निकाल देत येत्या दोन महिन्यांच्या आत त्यांचे पैसे व्याजासह अदा करण्याचे आदेशित केले आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

 Court Order
MGNREGA: सरसकट ग्रामपंचायतींत जादा ग्रामरोजगार सेवकांची नियुक्ती; 2 प्रकारच्या ग्रामपंचायतींत नियुक्तीस मान्यता

सिडकोने जर सदर प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे पैसे अदा न केल्यास न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी पुन्हा याचिका दाखल करण्यात येऊन जप्तीच्या कारवाईसाठी पुढील प्रक्रिया करण्याचे ॲड. आहुजा यांनी सांगितले.

या वेळी नानासाहेब महाले, केशवराव पाटील, दत्ता पाटील, राजेश गाढवे, लक्ष्मण जायभावे आदी उपस्थित होते.

 Court Order
Ganeshotsav: इच्छापूर्ती गणेशाची तृतीयपंथीयांच्या हस्ते स्थापना! लाडक्या गणरायाचे पंचवटी परिसरात जल्लोषात स्वागत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com