
Sudhakar Badgujar Enters BJP: ठाकरेंच्या शिवसेनेतून हाकालपट्टी झालेले नेते सुधाकर बडगुजर यांचा भाजप प्रवेश पार पडला. त्यांचा पक्ष प्रवेश पार पडल्यानंतर भाजपचे नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी नाशिक महापालिकेत 'अब की बार १०० पार'चा नारा दिला. त्यामुळं आता नाशिकमध्ये भाजपची ताकद वाढली आहे. पण दुसरीकडं आमदार सीमा हिरे यांनी बडगुजर यांच्या भाजप प्रवेशाला विरोद दर्शवला आहे. त्यामुळं स्थानिक पातळीवर भाजपत एक वेगळाच संघर्ष पाहायला मिळू शकतो.