
Sudhakar Badgujar: नाशिकमधील ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर हे काही वेळातच भाजपत प्रवेश करणार आहेत. तत्पूर्वी ठाकरेंच्या शिवसेनेतून त्यांची हाकालपट्टी करण्यात आली होती. पण आपल्याला पक्षातून का काढलं? हेच आपल्याला माहिती नाही. पक्षातील कोणीही आपल्याला याबाबत काहीही सांगितलेलं नाही, असं बडगुजर यांनी म्हटलं होतं. पण बडगुजर यांच्यावरील हाकालपट्टीच्या कारवाईबाबत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी स्पष्टच सांगितलं आहे.