नाशिक : विभागीय अधिकाऱ्यांना कर वसुलीसाठी 17 कोटींचे उद्दिष्ट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

NMC Nashik

नाशिक : विभागीय अधिकाऱ्यांना कर वसुलीसाठी 17 कोटींचे उद्दिष्ट

नाशिक : महापालिका (NMC) घरपट्टी (Homestead), पाणीपट्टी (Water Tax) विभागाची गेल्या काही वर्षापासून मोठ्या प्रमाणात थकबाकी आहे. ही बाब लक्षात घेता महापालिका आयुक्त रमेश पवार (NMC Commissioner Ramesh Pawar) यांनी विभागीय अधिकाऱ्यांना शंभर टक्के वसुलीसाठी प्रतिमहिना वसुलीचे उद्दिष्ट दिले आहे. महापालिकेच्या प्रशासकीय कामकाजात सुधारणा करताना आयुक्तांनी विभागीय अधिकाऱ्यांचे अधिकार वाढविले आहेत. (target of Rs 17 crore for tax collection for divisional officers Nashik News psl98)

त्याचसोबत संबंधितांना अधिकार देताना त्यांना कर वसुलीचे साधारण १७ कोटी रुपयांचे उद्दिष्ट दिले आहे. शहरातील सहाही विभागीय अधिकाऱ्यांनी मिळून १७ कोटी रुपये कर संकलन करण्याचे उद्दिष्ट आहे. विभागीय अधिकाऱ्यांनी नियमितपणे पाणीपट्टी व घरपट्टी वसुलीवर लक्ष केंद्रित करायचे आहे. आयुक्तांनी पदभार स्वीकारल्यापासून अधिकार वाढवून देताना विविध कर विभागाला वसुलीच्या सूचना दिल्या. उपायुक्त अर्चना तांबे यांनी स्वतः वसुलीसाठी विभागीय कार्यालय तसेच मोठया थकबाकीदारांकडे दौरा केला होता. शहरातील मोठ्या थकबाकीदारांकडे विभागीय अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन नियमित वसुलीवर लक्ष द्यावे, अशा सूचना दिल्या. कोरोनाच्या आर्थिक मंदीनंतर महापालिकेची आर्थिक घडी बसायला सुरवात झाली आहे. यंदा विक्रमी स्वरूपाची कर वसुली झाली आहे. तसेच, विभागीय स्तरावर अधिकाऱ्यांना अधिकार देताना कारवाईसह दंडाचे अधिकार मिळाल्याने महसूल वाढीला मदत होणार आहे.

हेही वाचा: सुट्टीतील वाचनालय; 'रूम टू रिड' योजनेंतर्गत पवारवस्तीत वाचनालय सुरू

विभागनिहाय उद्दिष्ट

पंचवटी ३ कोटी ७२ लाख

नाशिक पूर्व ३ कोटी २९ लाख

नाशिक रोड २ कोटी ९८ लाख

सिडको २ कोटी ९३ लाख

पश्चिम २ कोटी ४९ लाख

सातपूर १ कोटी ६२ लाख

हेही वाचा: विद्यार्थ्यांना यंदा 2 गणवेश; केंद्र सरकारकडून 215 कोटींचा निधी मंजूर

Web Title: Target Of Rs 17 Crore For Tax Collection To Divisional Officers Nashik News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :NashikNMC commissionertax
go to top