School Material News : शालेय साहित्यात 10 ते 20 टक्क्यांनी घट; खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी

Educational Material News
Educational Material Newsesakal
Updated on

Nashik News : येत्या काही दिवसात नवीन शैक्षणिक वर्षास सुरवात होणार आहे. शालेय साहित्य खरेदीसाठी बाजारपेठ गजबजू लागली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा साहित्यांच्या दरांमध्ये दहा ते वीस टक्क्यांची घट झाली आहे, अशी माहिती विक्रेत्यांकडून देण्यात आली.

जून सुरू होताच शालेय साहित्य खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी होते. सध्या नुकतेच कामगार वर्गाचे वेतन झाले आहे. त्यात येत्या काही दिवसात शाळा सुरू होणार आहे.

यंदाची विशेष बाब म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी सर्व प्रकारच्या शालेय साहित्यामध्ये दहा ते वीस टक्क्यांनी घट झाली आहे. (Ten to twenty percent reduction in school supplies Crowds in market to buy Inflows increased due to abundant production Nashik News )

वॉटर बॅग ते स्कूल बॅग अशा सर्व वस्तू दहा टक्क्यांनी, तर वह्या पुस्तकांचे १५ ते २० टक्क्यांनी दर घसरले आहे. गेल्या वर्षापर्यंत कोरोना प्रादुर्भावाची सर्वत्र भीती होती. वह्या- पुस्तकांसह विविध वस्तू उत्पादकांनी शाळा सुरू होती की नाही या भीतीपोटी कमी उत्पादन केले होते.

बाजारपेठेत आवक घटल्याने दर वाढले होते. गेल्या वर्षाच्या मध्यापासून परिस्थिती सामान्य झाल्याने या वर्षी उत्पादकांनी मुबलक उत्पादन केल्याने आवक वाढली आहे. त्यामुळे दर घटले असल्याची माहिती व्यावसायिकांनी दिली.

नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे. काही दिवसात खरेदीसाठी आणखी गर्दी वाढण्याची शक्यता आहे. दप्तराचे ओझे कमी करण्याच्या निमित्ताने शासनाने पहिली ते आठवी एक पुस्तक उपक्रम हाती घेतला आहे.

Educational Material News
NMC Nashik: पदोन्नती ‘घोडे’ बाजारात 2 पदांचे गिफ्ट; मागील चार- साडेचार वर्षात केलेले कामकाजाचे पराक्रम बाहेर

व्यवसायावर ५० टक्के परिणाम झाला आहे. या वर्षापासूनच उपक्रम लागू केल्यास शंभर टक्के परिणाम होण्याची शक्यता आहे.

व्यावसायिकांनी अगोदरच सर्व माल भरून ठेवला आहे. यंदापासूनच उपक्रम लागू केल्यास व्यावसायिकांनी खरेदी करून ठेवलेले पुस्तके रद्दीच्या भावात विक्रीची वेळ येणार आहे. त्यामुळे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.

वह्यांचे दर घटले, पाने झाले कमी

एका वहीमध्ये सरासरी २० पाने कमी झाले आहे. त्यामुळे दर कमी होऊनही तेवढेच आहे. अशा प्रतिक्रिया नागरिकांकडून दिल्या जात आहे. १०० पानी वहीत ७२, २०० पानी वहीत १७६, ३०० पानी वहीत २८०, ४०० पानी वहीत ३८४ पान आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Educational Material News
Nashik Maize Rate News : मक्याच्या बियाण्यांचे दर अव्वाच्या सव्वा; जिल्ह्यात यंदा मुख्य पीक ठरणार मका

" व्यावसायिकांनी पुस्तकांचा माल भरून ठेवलेला आहे. पहिली ते आठवी एक पुस्तक उपक्रमास प्रारंभ करताना व्यावसायिकांना विश्वासात घेऊन पुढील वर्षापासून उपक्रम राबवावा. यावर्षीपासून उपक्रम राबविल्यास व्यवसायिकांकडील माल व्यापाऱ्यांनी परत घेण्याची तरतूद करावी. अन्यथा व्यवसायिकांचे मोठे नुकसान होईल."

- इम्रान सय्यद, शालेय साहित्य विक्रेता

असे आहे दर

वस्तू दर

पेन ३ ते १००

पेन्सिल ३ ते ७

वॉटर बॅग ३० ते १५०

जेवणाचा डबा २० ते ८००

कंपास बॉक्स २० ते २००

पाऊच २० ते ५००

स्कूल बॅग १५० ते १ हजार

वह्या २५ ते ५५

Educational Material News
NMC News: होर्डिंगवर जिओ टॅगिंग लावण्याचा निर्णय; 150 होर्डिंगधारकांकडून स्टॅबिलिटी सर्टिफिकेट सादर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com