Ganeshotsav 2023 : इतिहासाची साक्ष असलेल्या गडकिल्ल्यांवरील गणेश! गडकोटांच्या प्रवेशद्वारावर गणपतीचे दर्शन

There are Ganesha idols on forts of Chhatrapati Shivaji Maharaj nashik news
There are Ganesha idols on forts of Chhatrapati Shivaji Maharaj nashik news esakal

Ganeshotsav 2023 : छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याच्या इतिहासाची साक्ष देणाऱ्या गडकिल्ल्यांवर गणेश मूर्ती आहेत. एवढेच नव्हे, तर गडकोटांच्या प्रवेशद्वारावर गणेशपट्टीचे दर्शन घडते.

किल्ल्यांच्या प्रवेशद्वाराच्या कमानीवर एका बाजूला अथवा दोन्ही बाजूला अथवा मधोमध चिन्ह अथवा शिल्प कोरलेलं दिसतं. त्याला द्वारशिल्प म्हटले जाते.

(लोकल ते ग्लोबल लेटेस्ट अपडेट मिळवा सकाळच्या व्हॉट्सअप चॅनेलवर फक्त एका क्लिकमध्ये)

द्वारशिल्पातून आपल्याला अनेक गोष्टी समजतात. द्वारशिल्प म्हणजे ते प्रवेशद्वार अथवा किल्ला बांधणाऱ्या, जिंकणाऱ्या राजसत्तेचे राजचिन्ह असते. किल्ला बांधणारा राज्यकर्ता मुख्य प्रवेशद्वारावर आपले राजचिन्ह बसवतो. या द्वारशिल्पामध्ये अनेक ठिकणी गणरायांची कोरीव मूर्ती सहज दिसते.

साल्हेर, मुल्हेर, हरिश्चंद्रगड, देरमाळ, पाबर, त्रिंगलवाडी, गाळणा, ब्रह्मगिरी आदी किल्ल्यांवर गणरायांचे दर्शन होते. किल्ल्यांवरील मंदिर बांधकामाची पद्धत हटके असल्याचे दिसते. त्याकाळी किल्ल्यावर ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग' करण्यात आले आहे.

There are Ganesha idols on forts of Chhatrapati Shivaji Maharaj nashik news
Nashik Ganeshotsav News : गणेशोत्सव काळात शहरातील वाहतूक मार्गात बदल; 'या' पर्यायी मार्गांचा करा अवलंब
हरिश्‍चंद्रगड, साल्हेर, त्रिंगलवाडी, गाळणा किल्ल्यावरील गणेशमूर्ती टिपल्या आहेत आनंद बोरा यांनी.
हरिश्‍चंद्रगड, साल्हेर, त्रिंगलवाडी, गाळणा किल्ल्यावरील गणेशमूर्ती टिपल्या आहेत आनंद बोरा यांनी.esakal

मंदिरात घुमणारा ‘इको' आवाज, मंदिरासमोरील टाके आणि त्यातील शुद्ध पाणी असे सारे उंचावरील किल्ल्यावर आपणाला पाहावयास मिळते.

जिल्ह्यात ६५ हून अधिक गड आणि किल्ले आहेत. राज्यातील सर्वात अवघड चढाई असलेले नाशिकच्या किल्ल्यांची अवस्था बिकट आहे. किल्यावरील मंदिरातील गणरायाच्या मूर्ती बऱ्या अवस्थेत आहे.

त्यांचे संवर्धन होण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत, असे इतिहास प्रेमींना वाटते. गडकिल्ल्यांना आठव्या शतकापासून ते अठराव्या शतकापर्यंतचा इतिहास आहे. गडकोटांवर अनेक मराठी राज्यांनी राज्य केले. त्यावेळी त्यांनी देव-देवतांची मंदिरे बांधली. काही देवतांच्या प्रतिमा कोरल्या.

There are Ganesha idols on forts of Chhatrapati Shivaji Maharaj nashik news
Nashik Ganeshotsav 2023: केदारनाथ धाम देखावा नागरिकांसाठी खुला; संविदानंद सरस्वती यांच्या हस्ते विधिवत पूजन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com