VIDEO : ड्वेन ब्राव्होला ‘हेलिकॉप्टर डान्स’च्या नाशिककर सचिन खैरनारकडून टिप्स...ब्राव्होने दिल्या ''सकाळ'ला शुभेच्छा!

dwen 1.jpg
dwen 1.jpg

नाशिक : एखाद्या देशाच्या प्रसिद्ध क्रिकेटपटूला क्षणभर बघण्यासाठी, त्याच्यासोबत सेल्फी किंवा छायाचित्र काढण्यासाठी हजारो जण जिवाचे रान करतात. अशा ‘स्टार’सोबत थेट मैत्री झाली तर..! साध्या कल्पनेचेही कुतूहल वाटावे, अशी किमया साधत नाशिकमधील कोरिओग्राफर सचिन खैरनार व वेस्ट इंडिजचा अष्टपैलू क्रिकेटपटू ड्वेन ब्राव्हो यांची आंतरराष्ट्रीय मैत्री सध्या जगभर चर्चेचा विषय झाली आहे. एवढेच नव्हे, तर केवळ मैत्रीपुरते मर्यादित न राहता ड्वेनने सचिनला चक्क गुरू बनविले अन्‌ थेट व्हिडिओ कॉलद्वारे हेलिकॉप्टर डान्सच्या टिप्सही घेतल्या. 

महेंद्रसिंह धोनीला वाढदिवसानिमित्त व्हिडिओची भेट 

येथील प्रख्यात नृत्यदिग्दर्शक सचिन खैरनार यांनी जगभर झळकलेल्या क्रिकेटर डी. जे. ब्राव्होचे ‘रन द वर्ल्ड’ गाण्यात भारताचे प्रतिनिधित्व केले होते. त्यानंतर पुन्हा महेंद्रसिंह धोनीच्या वाढदिवसाला सचिनने हेलिकॉप्टर नृत्यासाठी दिग्दर्शन केले. ड्वेन ब्राव्होने धोनीला शुभेच्छा म्हणून गेल्या मंगळवारी (ता. ७) हेलिकॉप्टर हे नृत्य प्रदान केले. तत्पूर्वी ड्वेन ब्राव्हो चार वर्षांपूर्वी जेव्हा ‘झलक दिखला जा’ या रिॲलिटी शोमध्ये स्पर्धक म्हणून झळकला, तेव्हाही त्याच्या नृत्याचे दिग्दर्शन सचिन खैरनार यांनीच केले होते. येथूनच दोघांच्या मैत्रीची पाळेमुळे घट्ट झाली. हेलिकॉप्टर स्टेपची कोरिओग्राफी सचिन यांची असून, चित्रपटसृष्टीत स्थिरावलेल्या महाराष्ट्रातील अनेक कलाकारांनी त्यात सहभाग घेऊन, तसेच कला-क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांकडून त्या स्टेपचे प्रशिक्षण घेऊन नृत्याचे व्हिडिओ बनवून धोनीला शुभेच्छा दिल्या. हे नृत्य मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्याने ब्राव्होनेदेखील व्हिडिओ कॉलद्वारे सचिन यांचे तोंडभरून कौतुक केले आहे. 

हेही पाहा > VIDEO : जेव्हा सुनीता ताईंकडून नकळत झाले कोरोनाबाधित मृतदेहावर अंत्यसंस्कार...पाहा थरारक आपबिती.. 

अशी झाली मैत्री... 
२०१६ मध्ये ‘झलक दिखला जा’ या रिॲलिटी शोमध्ये ब्राव्हो स्पर्धक होता. त्या वेळी तो व सचिन हे दोघे जवळपास अडीच महिने सोबत होते. त्यातूनच त्यांची मैत्री बहरली. भारतात आल्यावर ब्राव्हो सचिनला भेटल्याशिवाय राहत नाही. आतापर्यंत साधारणतः नऊ ते दहा वेळा त्यांची भेट झाली असून, एकत्रित फिरण्याचादेखील आनंद त्यांनी घेतला आहे. या मैत्रीची मोठी चर्चादेखील आहे. ब्राव्होच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरील दोघांचे एकत्रित फोटो, व्हिडिओ या मैत्रीची साक्ष देतात. लॉकडाउन काळात व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून ब्राव्होने सचिनकडून नृत्याच्या अनेक स्टेप्स शिकून घेतल्या आहेत. 

मैत्रीची आठवण
ब्राव्होबद्दल सांगायचं तर तो एक आंतरराष्ट्रीय क्रिकेटर आहे. त्याचबरोबर तो प्रसिद्ध गायकदेखील आहे. ब्राव्हो एवढ्या मोठ्या स्तरावर असूनही त्याने मैत्री जपली आहे. तो एक चांगला व्यक्ती आहे. भारतात आल्यावर तो या मैत्रीची आठवण ठेवून मला आवश्य भेटतो. -सचिन खैरनार, कोरिओग्राफर, नाशिक 

रिपोर्टर - भाग्यश्री गुरव

(संपादन - ज्योती देवरे)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com