Nashik News : म्हाळसाकोरेत बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकला ठार

Death News
Death Newsesakal

चांदोरी (जि. नाशिक) : म्हाळसाकोरे (ता. निफाड) येथे बिबट्याचा हल्ल्यात सात वर्षांचा बालक ठार झाला. ही घटना रविवारी (ता. २९) दुपारी साडेचारच्या दरम्यान घडली. त्यामुळे स्थानिकांमध्ये दहशतीचे वातावरण असून सायखेडा पोलिस व वनविभागा तपास करत आहे. (Toddler killed in leopard attack in Mhalsakore Nashik News)

हेही वाचा : T+1 Settlement मुळे वाढेल शेअर बाजारातली उलाढाल

Death News
Graduate Constituency Election : ‘पदवीधर’ साठी आज मतदान; जिल्ह्यात 29 मतदान केंद्रांची व्यवस्था

मृत बालक रोहन मूळचा म्हैसखडक (ता. सुरगाणा) येथील रहिवासी असून, तो वडील हिरामण ठाकरे व आई आराध्या यांच्यासमवेत म्हाळसाकोरे येथे आला होता. स्थानिक शेतकरी दत्तू मुरकुटे यांच्याकडे ते बागकाम करत होते.

काम आटोपल्यावर दुपारी साडेचारच्या सुमारास घराकडे परतत असताना द्राक्ष बागेशेजारील मक्यातून बिबट्याने रोहनवर हल्ला करत त्यास मक्यात नेत गंभीर जखमी करत ठार केले.

स्थानिकांनी सायखेडा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक पी. वाय. कादरी यांना कळविले असता पवन निकम, तान्हाजी झुर्डे यांनी पोलिसपाटील संपत नागरे, दत्तू मुरकुटे, बबन मुरकुटे, शरद बाजारे, बापू अष्टेकर यांच्यासमवेत पंचनामा केला. मृत्यूची नोंद करत वन विभागाला माहिती दिली. या घटनेमुळे म्हाळसाकोरेसह गोदाकाठ परिसरात दहशतीचे वातावरण आहे.

Death News
Nashik News : स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच तळवाडे- भामेरला धावली बस!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com