Nashik News: पर्यटनासाठी कोकण, गुजरात, राजस्थानला पसंती; मालेगावच्या पर्यटकांचा ओढा

Devotees flock to see Adimaya Saptshringi Devi.
Devotees flock to see Adimaya Saptshringi Devi.esakal

Nashik News : दिवाळीची सुट्टी आणि सलग आलेल्या विकेंड सुट्यांमुळे राज्यातील सर्वच पर्यटनस्थळावर पर्यटकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे पाहायला मिळत आहे. नाशिक जिल्ह्यासह इतर जिल्ह्यांतील पर्यटनस्थळांना पर्यटकांची पसंती मिळत आहे. शहर व परिसरातील पर्यटकांनी प्रामुख्याने मुंबई, कोकण, गुजरात, मध्यप्रदेश, राजस्थानला पसंती दिली.

अनेकांनी ओंकारेश्‍वर, महेश्‍वर, उज्जैन, इंदूर हे मध्यप्रदेशातील तर स्टॅच्यू ऑफ युनिटी, निळकंठ धाम, कुबेर या गुजरातमधील दोन ते तीन दिवसांच्या छोटेखानी टुरला पसंती दिली. दरम्यान गुजरातसह राज्यासह विविध राज्यातून दाखल झालेल्या पर्यटकांमुळे सप्तशृंगगडावर गर्दी वाढली आहे. पर्यटनस्थळांवर पोलिसांचा चोख बंदोबस्त बघायला मिळत आहे.

समुद्रकिनाऱ्यालगत असलेल्या कोकणला यंदा जिल्ह्यातील पर्यटक पसंती देत आहेत. गुजरातमधील सापुतारा येथे बोटिंगचा मनमुराद आनंद घेता येतो हाही एक फायदा आहे. (Tourists of Malegaon prefer Konkan Gujarat Rajasthan for tourism nashik news)

पर्यटकांनी या थंडगार हवेच्या ठिकाणालाही पसंती दिल्याचे पाहायला मिळत आहे. लक्ष्मीपूजनाच्या दुसऱ्या दिवसापासून पुढे आठवडाभराच्या कालावधीसाठी महाराष्ट्र पर्यटन विकास मंडळाची (एमटीडीसी) सर्व रिसॉर्ट आणि खासगी हॉटेल फूल झाली आहेत. नाशिक जिल्ह्यातील पर्यटकांची मुंबई, पुणे, महाबळेश्वर, कोकण व गोवा आदी भागांना पसंती मिळत आहे.

यंदाची दिवाळी सणाची सुटी प्राथमिक व माध्यमिक शाळांना २९ नोव्हेंबरपर्यंत असल्याने अनेक कुटुंबे पर्यटनाचा आनंद लुटताना दिसत आहेत. दिवाळीच्या सलग सुट्यांमुळे पर्यटकांना संधीच मिळाली. पर्यटकांच्या चारचाकी, मोठ्या ट्रॅव्हल्ससारख्या वाहनांची गर्दी जागोजागी दिसून येत होती. जिल्ह्यासह लगतची सर्वच पर्यटनस्थळे पर्यटकांनी गजबजून गेली आहेत.

दिवाळीच्या सुटीचा फायदा घेत सर्व कुटुंबीयांसमवेत कोकण, गोवा, मालवण, सिंधुदुर्ग अशा ठिकाणी पर्यटनाला जाण्यास पसंती दिली आहे. ज्यांना पर्यटन शक्य नव्हते अशा बहुसंख्य कुटुंबीयांनी शहराजवळील शेतमळे व फार्म हाऊस गाठून एकदिवसीय पर्यटनाचा व भोजनाचा आनंद लुटला.

Devotees flock to see Adimaya Saptshringi Devi.
Nashik News: किती महिलांना मिळाले स्वंयरोजगाराचे प्रशिक्षण? आकडेवारी उपलब्ध होत नसल्याने कामात बदल

एकदिवसीय पर्यटनासाठी...

सप्तशृंगगड, शिर्डी, चांदवड, पंढरपूर, उन्हई, सापुतारा, शेगाव, शबरीधाम, पंपा सरोवर, प्रकाशा, घृष्णेश्वर, वेरूळ -अजिंठा, नाशिक, सोमेश्वर, त्र्यंबकेश्वर, टाकेद, भंडारदरा, भावली डॅम, भिमाशंकर, पाटणा देवी, गौताळा, ओंकारेश्वर, परळी -वैजनाथ, औंढा नागनाथ, तुळजापूर, जेजुरी, देहू, आळंदी, पुणे, वज्रेश्वरी, मुंबई, पालघर, डहाणू, दीव-दमण, सिलव्हासा, खानवेल, शहराजवळील मडकी महादेव, गिरणा डॅम, हरणबारी, केळझर, सिद्धेश्वर, रोकडोबा हनुमान, दोधेश्वर, चिवटीबारी, साल्हेर, मुल्हेर.

"दिवाळी सुट्टयामुळे कुटुंबीयांसमवेत कोकण पर्यटनासाठी आलो आहोत. आम्ही सर्वच कुटुंबीय आनंदी आहोत खूप छान वाटत आहे. वर्षातून असा निवांत हवा असतो. त्यामुळे नवी ऊर्जा मिळते." - पुष्पक निकम, पर्यटक

"दिवाळीच्या सुट्या एन्जॉय करण्यासाठी कुटुंबीयांसोबत गोवा ट्रीप काढली. सुटीचा पुरेपूर आनंद लुटला. कुटुंबीयांना यातून आनंद मिळाला." - भाविक पाटील, पर्यटक.

Devotees flock to see Adimaya Saptshringi Devi.
Maratha Reservation: येवल्यात कुणबीच्या सापडल्या 4 हजार नोंदी; शोधमोहीम सुरू

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com