नाशिक : वाहतूक पोलिसांकडूनच मुंबई आग्रा महामार्गावर ट्रॅफिक जॅम

Traffic jam
Traffic jamesakal

ओझर (जि.नाशिक) : नाशिक शहर वाहतूक पोलिसांच्या (Traffic Police) हद्द आरंभीच्या ठिकाणी सुरू असलेल्या वाहतूक पोलिसांच्या जीवघेण्या वाहन तपासणी मुळे सामान्य वाहनधारक त्रस्त झाल्याचे चित्र आहे.

सामान्य वाहनधारक त्रस्त

मुंबई आग्रा महामार्गावरील (Mumbai- Agra Highway) जऊळके दिंडोरी हद्द पासून सुरू होत असलेले शहर पोलिसांच्या वाहन तपासणीमुळे पोलिसांबरोबर सामान्य वाहन धारकांच्या जीवाला मोठा धोका ठरू पाहत आहे. गरवारे पॉइंट (Garware Point) येथे भर महामार्गवर सुसाट येणाऱ्या वाहनांच्या समोर जात वाहतूक पोलीस गाड्या थांबवत आहे. रस्त्याच्या मधोमध प्लास्टिकचे बॅरिकेड्स लावत तीन लेन मधील वाहनांना एकच लेन मध्ये वळवून आपसूक जाळ्यात अडकत असून उर्वरित वाहनांना मात्र भर महामार्गावर पळत साईडला लावाच्या आरोळ्या देताना दिसत आहे.

Traffic jam
उपवासामुळे वजन कमी होण्याऐवजी वाढतेय? तुम्ही या ४ चूका करताय का?

पोलिसांनी दक्षता घेणे गरजेचे.....

आजपर्यंत पोलिसांच्या अपघाताच्या बातम्या अनेकवेळा बघितल्या असल्या तरी यात सर्वात भीषण अपघात हा पेठ येथे झाला होता. ज्या क्रूरपणे वाहतूक पोलिस जागीच ठार झाले त्याचा कुणीही बोध घेताना दिसत नाही. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी देखील याची दक्षता घेणे गरजेचे असून जेणेकरून वाहन चालक व पोलिसांचे जीव धोक्यात जाणार नाही.

Traffic jam
अनन्या जाणार हॉलीवूडला? अभिनेत्रीला आता नकोसे झाले बॉलीवूड

अधिकाऱ्याची अरेरावी

ज्या स्थळावर हा सर्व प्रकार सुरू होता येथील परिस्थितीचा फोटो काढण्यास प्रतिनिधी गेले असता त्यांच्यावरच कारवाई करण्याची भाषा उपस्थित अधिकाऱ्यांनी वापरली शिवाय फोटो काढण्यास मज्जाव करण्यात आला. "आम्हाला तुमच्या बातमीने काही फरक पडत नाही आमच्या जीवाचे आम्ही बघून घेऊ पण वसुली करूच" अशी भाषा सबंधित अधिकाऱ्याने वापरल्याने उपस्थित वाहन धारक पुरते अवाक झाले.

Traffic jam
Taxpayers ला बसणार मोठा झटका! जुनी टॅक्स स्लॅब पद्धत संपुष्टात येणार?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com