नाशिक : मतदार याद्यावर हरकती नोंदवण्यासाठी ‘ट्रू- व्होटर’ ॲप

NMC Election register objections on voter list through app
NMC Election register objections on voter list through appesakal

नाशिक : राज्यातील १४ महापालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी (NMC general elections) प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या (Voter list) प्रसिद्ध झाल्या असून, त्यातील त्रूटी दूर करून हरकती (OBjection) दाखल करण्यासाठी निवडणूक आयोगाने ‘ट्रू व्होटर’ मोबाईल ॲपद्वारे (Mobile Application) सुविधा उपलब्ध करून दिले आहे. (True Voter app to register objections on voter list Nashik nmc election News)

राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी सोमवारी (ता. २७) बृहन्मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण- डोंबिवली, उल्हासनगर, वसई- विरार, पुणे, पिंपरी- चिंचवड, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, अकोला, अमरावती आणि नागपूर महापालिकांना पत्र देऊन ही माहिती दिली. त्यानुसार प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध झालेल्या या सगळ्या महापालिका क्षेत्रातील मतदारांना त्यांच्या प्रारूप मतदार यादीत हरकती नोंदविण्यासाठी हे मोबाईल ॲप्लिकेशन उपलब्ध करून दिले आहे. १ जुलैपर्यंत हरकती व सूचना दाखल करता येणार आहे.

NMC Election register objections on voter list through app
अवैध मद्याची वाहतूक; वाहनासह एकाला अटक

प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या संबंधित महापालिकेत किंवा त्यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. त्यात आपले नाव तपासता येईल. ती सुविधा आता ‘ट्रू- व्होटर’ मोबाईल अॅपमध्येही उपलब्ध करून देण्यात आली आहे. विधानसभा मतदारसंघाची यादी प्रभागनिहाय विभाजित करताना त्यात नवीन नावांचा समावेश करणे किंवा नावे वगळण्याचा राज्य निवडणूक आयोगाला अधिकार नाही. एखाद्या मतदारास चुकीचा प्रभाग वाटप झाल्यास किंवा विधानसभेच्या मतदार यादीत नाव असूनही महापालिकेच्या मतदार यादीत नाव नसल्यास, हरकत दाखल करता येते. या हरकतींचा लवकर निपटारा होण्याच्या दृष्टीने राज्य निवडणूक आयोगाने एक नमुना अर्ज तयार केला आहे. त्याद्वारे हरकत घेता येणार आहे. ट्रू व्होटर मोबाईल ॲपद्वारेही सोप्या पद्धतीने हरकत दाखल करता यते, असेही श्री. मदान यांनी पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.

NMC Election register objections on voter list through app
धुळ्यात बर्निंक ट्रकचा थरार!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com