Crop Competition: राज्यस्तरीय पीकस्पर्धेत चौसाळेचे तुंगार दुसरे! सोयाबिनचे काढले हेक्टरी 38 क्विंटल उत्पन्न

soyabean
soyabean sakal

Crop Competition : शासनातर्फे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय पीक स्पर्धेत चौसाळे (ता. दिंडोरी) येथील प्रगतशील शेतकरी नारायण तुंगार यांचा आदिवासी गटातून राज्यात दुसरा क्रमांक आला आहे. (Tungar of Chausale second in state level crop competition Soybean yields 38 quintals per hectare harvested nashik news)

पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी प्रयोगशील शेतकऱ्यांना पीक उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन त्यांचा गौरव करण्याच्या उद्देशाने राज्यात पीकस्पर्धा घेण्यात येते. २०२२ मध्ये खरीप हंगामात धान, सोयाबीन, तूर, मूग, उडीद, भुईमूग, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी व सूर्यफूल या अकरा पिकांसाठी ही स्पर्धा झाली.

यात खरीप हंगामात नारायण मल्हारी तुंगार यांनी सोयाबीन पिकासाठी आदिवासी गटात भाग घेतला होता. या स्पर्धेसाठी विभागीय कृषी सहसंचालक मोहन वाघ, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे,

तत्कालीन उपविभागीय कृषी अधिकारी राकेश वाणी, तालुका कृषी अधिकारी विजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ कृषी अधिकारी ललित सूर्यवंशी, कृषी पर्यवेक्षक उत्तम भुसारे, कृषी सहाय्यक संदीपकुमार बोरवे यांचे सहकार्य लाभले.

पीक कापणी पर्यवेक्षण अधिकारी म्हणून मंडळ कृषी अधिकारी ज्ञानेश्वर नाठे यांनी काम पाहिले. श्री. तुंगार यांच्या यशामुळे कृषी विभागामार्फत कृषी सहाय्यक संदीपकुमार बोरवे, सरपंच ज्योती डंबाळे, उपसरपंच संदीप जोपळे, ग्रामसेवक दत्तात्रेय गायकवाड, तलाठी पूनम गायकवाड, पोलिस पाटील संदीप जोपळे, वसंत जोपळे, सम्राट राऊत आदींनी त्यांचा सत्कार केला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

soyabean
Nashik News : उंटाची पायपीट आता गुजरातच्या धरमपूरकडे! 2 दिवसांत होणार नाशिकहून स्थलांतर

सोयाबीनचे अडीचपट उत्पन्न

नारायण तुंगार यांनी त्याच्या एक हेक्टर ७३ आर क्षेत्रावर सोयाबीनचे राहुरी कृषी विद्यापीठाद्वारे प्रसारित झालेले फुले कल्याणी आर एस २२८ या आधुनिक वाणाची पेरणी केली होती. त्यांनी जिवाणू संवर्धकाची बीज प्रक्रिया केली तसेच वेळेवर आंतर मशागतीची कामे केली.

एकात्मिक खत व्यवस्थापनामध्ये सल्फरयुक्त खताचा वापर केला, पाणी व्यवस्थापनात फुलोराच्या अवस्थेत व दाणे भरण्याच्या अवस्थेत योग्य वेळी पाणी दिले. त्यामुळे त्यांना सोयाबीनचे हेक्टरी ३८.४० क्विंटल इतके सर्वसाधारण इतरांपेक्षा अडीच पट अधिक असे भरघोस उत्पादन घेतले.

"मला कृषी विभागाचे स्थानिक व तालुक्यातील अधिकाऱ्यांनी पीक स्पर्धेत भाग घेण्याविषयी माहिती देत पेरणीपासून तर काढणीपर्यंत वेळोवेळी मार्गदर्शन केले. कृषिच्या मार्गदर्शनामुळेच हे शक्य झाले आहे." - नारायण तुंगार, प्रगतशील शेतकरी चौसाळे

"शेतकरी बांधवांच्या उत्पादनात वाढ व्हावी यासाठी झालेल्या या स्पर्धेंतर्गत नारायण तुंगार यांनी वेळोवेळी कृषी विभागाचे मार्गदर्शन घेत सोयाबीनचे भरघोस उत्पन्न काढले. त्यांचा आदर्श इतर शेतकऱ्यांनीही घ्यावा." - विजय पाटील, तालुका कृषी अधिकारी दिंडोरी

soyabean
Intercaste Marriage Scheme: ‘आंतरजातीय विवाह’ योजनेचे 3 कोटींचे अनुदान रखडले; लाभार्थ्यांमध्ये नाराजी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com