"शिक्षक उपाशी शासन तुपाशी,अजुन किती दिवस फुकट काम!" विनानुदानीत शिक्षकांची पायी दिंडी

teachers dindi.jpg
teachers dindi.jpg

येवला (नाशिक) : शिक्षक उपाशी शासन तुपाशी,अजुन किती दिवस फुकट काम करायला लावता,वेतनाच्या प्रतीक्षेत २८ आत्महत्या झाल्या,अजून किती होऊ देणार असे विविध प्रश्न करत अनुदानाची घोषणा केली..त्याची अंमलबजावणीही करा असा नारा देऊन उच्च माध्यमिक, कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेने आज पासून येवला ते संगमनेर पायी दिंडीला प्रारंभ केला आहे.घोषणेप्रमाणे तत्काळ अनुदान वितरित करावे या मुख्य मागणीसाठी हे लक्षवेधी आंदोलन सुरू झाले आहे.

अजून किती दिवस फुकट काम करायला लावता!
राज्य विनाअनुदानित कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक कृती संघटनेने आज येवल्यापासून या आंदोलनाला सुरुवात केली.आज (ता.१) सकाळी नाशिक,धुळे,जळगाव,नंदुरबार, जिल्ह्यातील विनाअनुदानित कृती समितीचे शिक्षक येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात जमले. या ठिकाणाहून शिक्षक आमदार किशोर दराडे यांच्या कार्यालयावर जाऊन निवेदन देण्यात आले. याठिकाणी समितीचे राज्य सचिव अनिल परदेशी यांनी मार्गदर्शन करून शासनाने घोषणेप्रमाणे अनुदान देऊन उपाशीपोटी ज्ञानदान करणार्‍या शिक्षकांना व त्यांच्या कुटुंबियांना वेतन द्यावे अशी मागणी केली.त्यानंतर पायी दिंडी कोपरगावच्या दिशेने रवाना झाली असून आता ही दिंडी पोहेगाव (ता.कोपरगाव) येथे पोहोचली आहे.

बाळासाहेब थोरात यांना निवेदन देऊन होणार दिंडीचा समारोप

या दिंडीत आज ३५ शिक्षकांनी सहभाग घेतला असून ही संख्या रोज वाढत जाणार आहे.संगमनेर येथे महसूल मंत्री तथा अनुदान उपसमितीचे प्रमुख बाळासाहेब थोरात यांना निवेदन देऊन या दिंडीचा समारोप होणार आहे.
असंख्य आंदोलने केल्यानंतर शासनाने १३ सप्टेबर २०१९ ला १४६ व १६३८ विनाअनुदानित ज्यु. कॉलेज अनुदानासाठी पात्र घोषित करण्यात आले असून १७ जानेवारी ते २४ फेब्रुवारी पर्यंत प्रत्येक कॉलेजची तपासणी अर्थखात्याकडून झाली आहे.तर २० टक्के अनुदान देण्यासाठी मार्चच्या अधिवेशनात १०७ कोटीची पुरवणी मागणी मंजूर केली आहे. अर्थखात्याचे निकष ज्यु कॉलेज उच्च माध्यमिक शाळांनी आधीच पूर्ण केलेले आहेत. तरीही अजून पर्यंत शासनाकडून अनुदान मंजूर असूनही एक रुपयाही वेतन मिळालेले नाही.याबाबत मागील महिन्यात जेष्ठ नेते शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहावर विनाअनुदानित शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी बैठक पार पडली.

केवळ पगार मिळत नसल्यानेच शिक्षकांच्या आत्महत्या

या बैठकीत उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार,शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड,शिक्षक आमदार, वित्त सचिव सर्व हजर होते.त्यानंतर उपसमिती गठीत झाली कि दोन कॅबिनेटच्या आत निर्णय देतो असे आश्वासन मंत्री थोरात यांनी दिले होते.परंतु अद्यापही त्याबाबतची बैठक झाली नाही.त्यामुळे उच्च माध्यमिक शाळांचे निधी वितरण झाले नसून लॉकडाऊन काळात २७ शिक्षकांच्या आत्महत्या या केवळ पगार मिळत नसल्या कारणाने झाल्या आहेत.


शासनाने अनुदान वितरणाचा निर्णय घेऊन उच्च माध्यमिक शिक्षकांना न्याय द्यावा या मागणीसाठी पायी दिंडी आंदोलन सुरू करण्यात आली आहे.आंदोलनात यावेळी जेष्ठ नेते संभाजी पाटील,राज्य सचिव अनिल परदेशी,संघटनेचे विभागीय कार्याध्यक्ष कर्तारसिंग ठाकूर,जिल्हाध्यक्ष निलेश गांगुर्डे,नाशिक तालुकाध्यक्ष विशाल आव्हाड, प्रमोद रुपवते, विभाग कार्याध्यक्ष दिनेश पाटील, गुलाब साळूंखे, महेंद्र बच्छाव, पी एम तायडे, विजय सोनवने, सुरेश कापुरे, कटरे, वळवी, किरण पैठणकर, राऊसाहेब मोहन,
भाऊसाहेब अनर्थे, किरण गायकवाड आदी उपस्थित होते.

संपादन - ज्योती देवरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com