esakal | लसीकरण केंद्रावर मागणी वाढली; लसपुरवठा मात्र अपुरा
sakal

बोलून बातमी शोधा

vaccination

शहरात 123 लसीकरण केंद्रे; मागणी वाढती, लसपुरवठा मात्र अपुरा

sakal_logo
By
विक्रांत मते

नाशिक : लोकप्रतिनिधींच्या दबावामुळे महापालिकेकडून शहरात मागेल त्याला लसीकरण केंद्र मोहीम राबविल्याने शहरात तब्बल १२३ लसीकरण केंद्रांची निर्मिती झाली आहे. परंतु, प्रत्येक केंद्रावर लस देणे शक्य नसल्याने प्राप्त झालेल्या लशींचे समप्रमाणात वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने त्यानुसार एका केंद्रावर ७० लस कुप्या उपलब्ध होत आहेत. त्यामुळे तासाभरातच लसीकरण मोहीम संपुष्टात येत असल्याने चमकोगिरी करणाऱ्या नगरसेवकांनाही जनजागृती मोहीम आटोपती घ्यावी लागत आहे. (Vaccination-Centers-Demand-rising-vaccine-supply-marathi-news-jpd93)

प्रत्येक केंद्रावर फक्त ७० कुप्या

१६ जानेवारीपासून शहरात लसीकरण मोहिमेला सुरवात झाली. शहरात पहिला डोस घेणारे तीन लाख ७७ हजार ६०४ नागरिक असून, दुसरा डोस घेतलेले एक लाख १७ हजार १४३ लोक आहेत. दोन दिवसांत पाच लाख दोन हजार ७४७ नागरिकांना डोस देण्यात आले. नाशिककरांची पसंती कोव्हिशील्डलाच असून, पहिला डोस घेतलेले तीन लाख ३७ हजार ५८६, तर दुसरा डोस घेतलेले ८६ हजार ३२९ नागरिक आहेत. कोव्हिशील्डचे एकूण चार लाख २३ हजार ९१५ डोस झाले आहेत. कोव्हॅक्सिनचा पहिला डोस घेतलेले ४० हजार १८ नागरिक असून, ३० हजार ८१४ नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. कोव्हॅक्सिनचे एकूण ७० हजार ८३२ डोस झाले आहेत. दरम्यान, निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर लसीकरण केंद्र मिळविण्यासाठी आजी-माजी नगरसेवकांबरोबरच निवडणुकीत इच्छुक असलेल्या उमेदवारांकडून लसीकरण केंद्रांची मागणी होत आहे. महापालिकेच्या वैद्यकीय विभागानेही हात आखडता न घेता मागेल त्याला लसीकरण केंद्र दिले. परंतु केंद्रे अमाप झाली तरी लस उपलब्ध होत नसल्याने प्राप्त लशींनुसार प्रत्येक केंद्रावर ७० कुप्या दिल्या जात आहेत.

पोस्ट कोविडच्या १७६ रुग्णांची नोंद

कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने कमी होत असताना आता पोस्ट कोविडचे मोठे आव्हान महापालिका प्रशासनासमोर आहे. दोन महिन्यांत पोस्ट कोविड अर्थात, कोरोनाबाधित उपचाराअंती बरे झाल्यानंतर अंगदुखी, ताप यांसारखे आजार निर्माण होत असून, शहरात खासगी व सरकारी रुग्णालयांकडून प्राप्त माहितीनुसार १७६ रुग्णांची नोंद झाली आहे. महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी विभागप्रमुखांची आढावा बैठक घेतली. त्यात वैद्यकीय विभागाने दिलेल्या माहितीनुसार कोरोनाबाधित उपचाराअंती बरे झाल्यानंतर त्यातील १७६ रुग्णांना अंगदुखी, ताप असे आजार होत असल्याची माहिती दिली. या रुग्णांवर लक्ष ठेवून अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या.

हेही वाचा: लग्नपत्रिकेवरून 'लव्ह जिहाद'चा आरोप; लग्न मोडण्याची वेळ

हेही वाचा: गाडीच्या बोनेटवर चढला मोठा साप; तरीही तब्बल 2 किमीचा प्रवास

loading image