Nashik News: वणी ग्रामीण रुग्णालयातील सोनोग्राफी मशिन बंद; गरोदर माता, पोटाच्या विकाराच्या रुग्णांची गैरसोय

District surgeon dr. Sarpanch Madhukar Bharasat, Ravikumar Sonwane etc. while giving to Ashok Thorat.
District surgeon dr. Sarpanch Madhukar Bharasat, Ravikumar Sonwane etc. while giving to Ashok Thorat.esakal

Nashik News : आदिवासी भागातील गरोदर मातांची तपासणी व पोटाच्या विकाराच्या रुग्णांची तपासणी करण्यासाठी वणी ग्रामीण रुग्णालयात तीन महिन्यांपूर्वी नवीन सोनोग्राफी मशिन उपलब्ध झाले.

मात्र, मशिन चालविण्यासाठी तंत्रज्ञ नसल्याने गरोदर मातांची मोठी गैरसोय होत असून, खासगी सोनोग्राफीसाठी आर्थिक भुर्दंड बसत आहे.

याबाबत वणीचे सरपंच मधुकर भरसट यांनी जिल्हा शल्यचिकित्सकांकडे सोनोग्राफी तंत्रज्ञ (रेडिओलॉजिस्ट) उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. (Vani Rural Hospital Sonography Machine Stopped Inconvenient for pregnant mothers stomach disorder patients Nashik News)

दिंडोरी, पेठ, कळवण, सुरगाणा, चांदवड या तालुक्यांतील रुग्णांना उपचारांसाठी वणी येथे यावे लागते. वणी ग्रामीण रुग्णालयात क्ष किरण, रक्त- लघवी तपासणीसह सर्व सुविधा उपलब्ध आहेत.

आदिवासी भागातील गरोदर माता व पोटाच्या विकाराच्या रुग्णांची तपासणी करण्यासाठी शासनातर्फे ग्रामीण रुग्णालयात सोनोग्राफी मशिन देण्यात आले. मात्र, मिळाल्यापासून त्याचा वापर सुरू झालेला नाही.

हे मशिन एका खोलीत अद्याप सीलबंद अवस्थेत आहे. त्यामुळे रुग्णालयात येणाऱ्या गरोदर महिलांना खासगी केंद्रांवर सोनोग्राफीसाठी जावे लागते. त्यात गरीब आदिवासी रुग्णांना मोठा आर्थिक भुर्दंड बसतो किंवा आर्थिक परिस्थिती नसल्याने काही जणी सोनोग्राफीही करीत नाहीत.

वणीत एकच खासगी सोनोग्राफी केंद्र सुरू आहे. त्यामुळे संपूर्ण भार एकाच सोनोग्राफी केंद्रावर येतो. येथे सोनोग्राफीसाठी गर्भवती महिलांना तासन्‌तास वाट पाहावी लागते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

District surgeon dr. Sarpanch Madhukar Bharasat, Ravikumar Sonwane etc. while giving to Ashok Thorat.
Nashik News: ‘दोष निवारणा’वरून ठेकेदार आक्रमक; ZPच्या निर्णयाविरोधात कोर्टात जाण्याच्या तयारीत

त्यामुळे वणी ग्रामीण रुग्णालयात उपलब्ध झालेले सोनोग्राफी मशिन कार्यान्वित करून रुग्णांच्या आवश्यक तपासण्या व्हाव्यात, यासाठी रेडिओलॉजिस्टची नेमणूक करण्याच्या मागणीचे निवेदन सरपंच भरसट यांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांना दिले.

या वेळी अतिरिक्त जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. राजेंद्र बागूल, रविकुमार सोनवणे, ग्रामपंचायत सदस्य राहुल गांगुर्डे, जगन वाघ उपस्थित होते.

दरम्यान, लवकरच वणी ग्रामीण रुग्णालयात आठवड्यातून एक दिवस निश्चित करून त्या दिवशी सोनोग्राफी तंत्रज्ञ उपलब्ध करून देण्यात येईल, असे आश्वासन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. थोरात यांनी दिल्याची माहिती सरपंच भरसट व श्री. सोनवणे यांनी दिली.

District surgeon dr. Sarpanch Madhukar Bharasat, Ravikumar Sonwane etc. while giving to Ashok Thorat.
Nashik News: दीड महिन्यातच कॅथलॅब मशिन नादुरुस्त; समस्या कायमस्वरूपी सोडविण्यासाठी आंदोलनाचा इशारा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com