Nashik News: दीड महिन्यातच कॅथलॅब मशिन नादुरुस्त; समस्या कायमस्वरूपी सोडविण्यासाठी आंदोलनाचा इशारा

Officials of Shiv Sena Uddhav Thackeray group while giving a statement demanding to permanently solve the problem of malfunctioning of coffee machines.
Officials of Shiv Sena Uddhav Thackeray group while giving a statement demanding to permanently solve the problem of malfunctioning of coffee machines.esakal

Nashik News : संदर्भ सेवा रुग्णालयातील कॕथलॕब मशिन दुरुस्तीनंतर दीड महिन्यातच पुन्हा नादुरुस्त झाली. अनेक दिवसांपासून मशिन बंद असल्याने रुग्णांना अडचणीस सामोरे जावे लागत होते.

एका वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांची कानउघाडणी केल्यानंतर गुरुवारी (ता. ३१) दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले.

वारंवार नादुरुस्त होण्याची समस्या कायमस्वरूपी सोडवावी. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून देण्यात आला. (Cathlab machine broken within one half months Warning of movement to solve problem permanently Nashik News)=

शालिमार येथील संदर्भ सेवा रुग्णालयातील एन्जोग्राफीचे कॕथलॕब मशिन अनेक दिवसांपासून मशिन बंद असल्याने रुग्णांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत होते. रुग्णांना खासगी रुग्णालयाचा रस्ता दाखविला जात होता.

पालकमंत्री दादा भुसे यांच्या मध्यस्थीने दीड महिन्यापूर्वी लाखो रुपये खर्च करून मशिनची दुरुस्ती करण्यात आली. दुरुस्तीनंतर अवघ्या काही दिवसातच पुन्हा मशिन नादुरुस्त झाली. रुग्णांचे प्रचंड हाल होत होते.

काही दिवसापूर्वी शिवसेना उद्धव गटाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी रुग्णालय प्रशासनाचा भोंगळ कारभारावर अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली. गोरगरिबांसाठी असलेले रुग्णालय केवळ नावापुरते राहिले आहे.

बहुतांशी वेळेस रुग्णांना खासगी रुग्णालयाचा संदर्भ दिला जात आहे. असे प्रकार थांबवावे. मशिनची त्वरित दुरुस्ती करण्यात यावी. वारंवार निर्माण होणारी समस्या कायमस्वरूपी सोडवावी, अशी मागणी केली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Officials of Shiv Sena Uddhav Thackeray group while giving a statement demanding to permanently solve the problem of malfunctioning of coffee machines.
Nashik Rain Crisis: नांदगाव तालुका दुष्काळाच्या सावटाखाली; खरिपातील उत्पन्नात घट?

गुरुवारी मशिन दुरुस्तीस प्रत्यक्षात सुरवात करण्यात आली. दुरुस्ती झाल्यानंतर आणखी किती दिवस मशिन सुस्थितीत राहील सांगता येत नाही. यासाठी शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडूनही यासंदर्भात आक्रमक पवित्रा घेतला.

एन्जोग्राफी कॕटलॕब मशिनची समस्या कायमस्वरूपी सोडवत रुग्णांची गैरसोय टाळावी. अन्यथा शिवसेना ठाकरे गटातर्फे रुग्णालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, अशा इशाऱ्याचे निवेदन अधिकाऱ्यांना देण्यात आले.

शिवसेना मध्य नाशिक विधानसभाप्रमुख बाळासाहेब कोकणे, महानगर संघटक सचिन बांडे, उपमहानगरप्रमुख सुनील जाधव, संजय परदेशी, वीरेंद्रसिंग टिळे, संदेश फुले, विधानसभा संघटक राजेंद्र क्षीरसागर, ऋषी वर्मा, विभागप्रमुख मंदार बर्वे, रियाज बागवान, योगेश चव्हाण, प्रकाश बर्वे, गणेश आतारी आदी उपस्थित होते.

Officials of Shiv Sena Uddhav Thackeray group while giving a statement demanding to permanently solve the problem of malfunctioning of coffee machines.
Nashik News: ‘दोष निवारणा’वरून ठेकेदार आक्रमक; ZPच्या निर्णयाविरोधात कोर्टात जाण्याच्या तयारीत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com