Vijaykumar Gavit: विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या सोयीसाठी वसतिगृह बांधण्यावर भर देणार

 Vijaykumar Gavit statement Emphasis will be placed on building hostels for convenience of students education nashik news
Vijaykumar Gavit statement Emphasis will be placed on building hostels for convenience of students education nashik news

Vijaykumar Gavit : शहरी भागात आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या सोयीसुविधांसोबतच त्यांना राहण्याची सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी आदिवासी शासकीय वसतिगृह बांधण्यावर भर देण्यात येईल, असे प्रतिपादन आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी बुधवारी (ता. २९) येथे केले.

नाशिक येथे आदिवासी विकास विभागाच्या आदिवासी मुलींचे शासकीय वसतिगृह इमारतीचे उद्‍घाटन बुधवारी आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. (Vijaykumar Gavit statement Emphasis will be placed on building hostels for convenience of students education nashik news)

आदिवासी विकास विभागाच्या आयुक्त नयना गुंडे, आदिवासी विकास महामंडळाच्या संचालिका लीना बनसोड, आदिवासी विकास विभागाच्या सहआयुक्त विनिता सोनवणे, आदिवासी सार्वजनिक बांधकाम मंडळाचे अधीक्षक अभियंता विजय पाटील, कळवण एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी विशाल नरवाडे, कार्यकारी अभियंता एस. एस. सांगळे, किसान मोर्चाचे एन. डी. गावित आदी उपस्थित होते.

डॉ. गावित की, शहरी भागात भाड्याच्या व जुन्या वसतिगृहातील प्रत्येकी २५० अशा एकूण ५०० विद्यार्थिनींना या नवीन वसतिगृहात स्थलांतरित करण्यात येणार आहे. स्थलांतरामुळे रिक्त झालेल्या वसतिगृहात नवीन विद्यार्थिनींना प्रवेश देण्यात येणार आहे. जेणेकरून शहरात येणाऱ्या आदिवासी विद्यार्थिनींची राहण्याची गैरसोय होणार नसल्याचे त्यांनी सांगितले. पंडित दीनदयाळ उपाध्याय योजनेंतर्गत जिल्ह्यासोबतच तालुकास्तरावर देखील निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

 Vijaykumar Gavit statement Emphasis will be placed on building hostels for convenience of students education nashik news
Vijayakumar Gavit : आदिवासींचे जीवनमान उंचावण्यासाठी कटिबद्ध : डॉ. विजयकुमार गावित

तसेच वसतिगृहात राहाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या जेवणाची सोयही मेसच्या माध्यमातून करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. यासोबतच आदिवासी प्रशासकीय संकुलास मान्यता देण्यात आली आहे. या संकुलामध्ये प्रशासकीय कार्यालय, जात प्रमाणपत्र पडताळणी, प्रकल्प कार्यालय असे विविध प्रशासकीय कार्यालयांचा समावेश असणार आहे.

लिपिक, सुरक्षारक्षक, वाहनचालक अशा विविध पदांच्या स्पर्धा परीक्षांच्या सरावासाठी ॲकॅडमी सुरू करण्याचे नियोजन करण्यात येत असल्याचेही डॉ. गावित यांनी या वेळी सांगितले. कार्यक्रमाच्या सुरवातीला उपस्थित मान्यवरांनी वसतिगृहाची पाहणी करून कोनशिलेचे अनावरण केले. त्यानंतर आदिवासी क्रांतिकारकांच्या प्रतिमांचे पूजन करून दीपप्रज्वलन करण्यात आले.

 Vijaykumar Gavit statement Emphasis will be placed on building hostels for convenience of students education nashik news
Vijayakumar Gavit: राज्यातील सर्व आदिवासींना दोन वर्षांत घरे : डॉ. गावित

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com