Nashik Kanda Lilav: विंचूर उपबाजाराची कांदा लिलावात आघाडी; बंदमुळे लासलगाव बाजार समितीच्या लिलावाला फटका

onion
onion esakal

Nashik Kanda Lilav : आशिया खंडातील कांद्याची अग्रेसर बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या लासलगाव बाजार समितीचे श्री छत्रपती शिवाजी महाराज स्वतंत्र आवारातील कांद्याचे लिलाव ऑगस्टपासून वेगवेगळ्या कारणांमुळे सतत बंद ठेवले जात आहेत. यामुळे कांद्याच्या लिलावावर परिणाम झाला आहे.

लासलगाव बाजार समितीच्या विंचूर उपबाजार समितीने चार महिन्यांत कांदा लिलावात आघाडी घेत लासलगाव मुख्य कांदा आवारापेक्षाही एक लाख १४ हजार क्विंटलने अधिक कांद्याचे लिलाव केले आहेत. (Vinchur sub market leads onion auction nashik news)

विंचूर उपबाजार समितीने लासलगावच्या श्री छत्रपती शिवाजी महाराज स्वतंत्र कांदा बाजार आवाराला पिछाडीवर टाकत कांदा लिलावात ऐतिहासिक नोंद केली. लासलगाव येथे ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि १९ नोव्हेंबरपर्यंत एकूण ११२ दिवसांत दीपावलीत साप्ताहिक सुट्ट्या आणि कांदा व्यापाऱ्यांच्या मनमानी निर्णयामुळे ४७ दिवस कांद्याचे लिलाव बंद होते.

सहा लाख ९७ हजार क्विंटलची कांद्याची आवक झाली, तर विंचूर येथे याच दिवसांत कांदा व्यापारी, कामगारांनी कांदा लिलावात सातत्य ठेवले आणि शेतकऱ्यांनी कांदा विक्रीसाठी आणल्याने आठ लाख ११ हजार क्विंटल कांद्याची आवक झाली.

लासलगाव बाजार समितीच्या छत्रपती शिवाजी महाराज स्वतंत्र कांदा बाजार आवाराला मागे टाकत आघाडी घेतली असून, येणाऱ्या दिवसात अधिक कांद्याचे लिलाव करत ही आघाडी कायम ठेवता येईल, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे लासलगाव बाजार समितीचे संचालक पंढरीनाथ थोरे यांनी सांगितले.

onion
Nashik Onion News: कांदाप्रश्नी केंद्रीय समितीचे ‘वरातीमागून घोडे’; ग्राहकहितासाठी आता कळवळा

छत्रपती शिवाजी महाराज स्वतंत्र कांदा बाजारात झालेली कांद्याची आवक (क्विंटलमध्ये)

-ऑगस्ट : तीन लाख ११ हजार

-सप्टेंबर : एक लाख १४ हजार

-ऑक्टोबर : दोन लाख ४० हजार

-७ नोव्हेंबरपर्यंत : ३२ हजार

विंचूर उपबाजारात झालेली कांद्याची आवक (क्विंटलमध्ये)

-ऑगस्ट : तीन लाख २२ हजार

-सप्टेंबर : एक लाख ६५ हजार

-ऑक्टोबर : दोन लाख ४९ हजार

१३ नोव्हेंबरपर्यंत : ७५ हजार

विंचूरला २८ दिवस लिलाव बंद

१ ऑगस्ट ते १९ नोव्हेंबरपर्यंत एकूण ११२ दिवसांत लासलगावच्या श्री छत्रपती शिवाजी महाराज स्वतंत्र कांदा बाजार आवार साप्ताहिक सुट्ट्या, दीपावली आणि व्यापाऱ्यांनी वेगवेगळ्या कारणासाठी बंद ठेवले. एकूण ४७ दिवस कांदा लिलाव बंद राहिले. विंचूर उपबाजारात २८ दिवस कांदा लिलाव बंद होते.

onion
Nashik Onion Crisis: पाण्याअभावी पीक सोडून देण्याची वेळ! कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com