Nashik Bank Election: सरकारी, परिषद कर्मचारी बँकेसाठी उद्या होणार मतदान; निवडणूक स्थगित आदेश रद्द

Bank Election
Bank Electionesakal

Nashik Bank Election : राज्यातील सहकारी संस्थांच्या पंचवार्षिक निवडणुका ३० सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आल्याचा फटका अगदी तोंडावर निवडणूक आलेल्या नाशिक जिल्हा सरकारी व परिषद सहकारी बॅंकेला बसला होता.

खासदार हेमंत गोडसे यांनी सहकारमंत्री अतुल सावे यांच्याकडे हा प्रश्न मांडल्याने सहकार विभागाने बॅंकेच्या निवडणुकीला दिलेली स्थगिती उठवत निवडणूक ठरल्याप्रमाणे २ जुलैलाच घेण्यात येणार असल्याचा नवा आदेश शासनाने काढला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या जीव भांड्यात पडला आहे. (Voting tomorrow for Govt Council Employees Bank Cancellation of election postponement order nashik bank election news)

जिल्हा सरकारी व परिषद कर्मचारी सहकारी बँकेचे सभासद हे जिल्हा परिषद आणि इतर शासकीय विभागांतील अधिकारी आणि कर्मचारी आहेत. दोन्ही पॅनलच्या उमेदवारांनी अवघा जिल्हा पिंजून काढत प्रचार केला होता.

मात्र, निवडणूकच रद्द झाल्याने सर्वांचा हिरमोड झाला होता. याप्रश्नी उमेदवार, त्यांच्या समर्थकांनी खासदार गोडसे यांच्याकडे धाव घेत शासनाकडे शिष्टाई करण्याची मागणी केली. श्री. गोडसे यांनी दोन दिवसांवर आलेली निवडणूक घ्यावी, अशी विनंती केली.

निवडणूक असलेल्या बँकेचे मतदार शेतकरी नाहीत. त्यामुळे निवडणूक पुढे न ढकलता ठरवल्याप्रमाणेच घ्यावी, असे त्यांनी सांगितले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Bank Election
Jalgaon ZP School : पहिलीची पटसंख्या देतेय धोक्याची घंटा; जिल्हा परिषद शाळांची स्थिती

यानंतर शुक्रवारी (ता. ३०) पॅनलच्या उमेदवारांनी मुंबईत पुन्हा सहकारमंत्री सावे यांची भेट घेतली. त्यानंतर शासनाने वरीलप्रमाणे आदेश काढत निवडणूक ठरल्याप्रमाणेच घेण्यात येईल, असे स्पष्ट केले.

"जिल्हा सरकारी व परिषद बॅंकेची निवडणूक २ जुलैलाच होणार आहे. तसे आदेश प्राप्त झाले आहेत. रविवारी (ता. २) सकाळी ८ ते ५ या वेळात व्ही. एन. नाईक शिक्षण संस्थेच्या शाळेत २० केंद्रांवर मतदान होईल. त्यासाठी सर्व तयारी झाली असून, दीडशे कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सेवानिवृत्त सभासदांना मात्र मतदान करता येणार नाही."

- गौतम बलसाणे, निवडणूक अधिकारी, जिल्हा सरकारी व परिषद बँक

Bank Election
NMC School Uniform: मनपा विद्यार्थ्यांच्या गणवेशाचा विषय मार्गी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com