esakal | नाशिकरोड वगळता गुरुवारी पाच विभागात पाणी पुरवठा बंद
sakal

बोलून बातमी शोधा

water tap.jpg

गंगापूर धरणाच्या बाजूला असलेल्या महापालिकेच्या पंपींग स्टेशन वरील ३३ किलोवॅट ओव्हरहेड वायर महावितरण कंपनीच्या वतीने भूमिगत केली जाणार असल्याने गुरुवारी (ता. २२) नाशिकरोड वगळता पाचही विभागातील पाणी पुरवठा बंद राहणार आहे.

नाशिकरोड वगळता गुरुवारी पाच विभागात पाणी पुरवठा बंद

sakal_logo
By
विक्रांत मते

नाशिक : गंगापूर धरणाच्या बाजूला असलेल्या महापालिकेच्या पंपींग स्टेशन वरील ३३ किलोवॅट ओव्हरहेड वायर महावितरण कंपनीच्या वतीने भूमिगत केली जाणार असल्याने गुरुवारी (ता. २२) नाशिकरोड वगळता पाचही विभागातील पाणी पुरवठा बंद राहणार आहे.

नाशिकरोड वगळता शहरात गुरूवारी पाणीबाणी 

सिडको विभागातील प्रभाग क्रमांक २४ ते २६ व २८ मधील उंटवाडी, जगताप नगर, कालिका पार्क, इंद्रनगरी, कामटवाडे परिसर, पवननगर, आयटीआय पूल, शिवशक्ती चौक, शाहू नगर, खुटवड नगर, बंदावणे नगर, साळूंखे नगर, महालक्ष्मी नगर, डीजीपी नगर क्रमांक २, मुरारी नगर, वावरे नगर, अंबड माऊली लॉन्स परिसर, पुर्व विभागात वडाळा गांव, वडाळा रोड, जे. एम. सिटी कॉलेज, जयदीप नगर, साईनाथ नगर, विनयनगर परिसर, द्वारका व काठे गल्ली, जयशंकर नगर, टाकळी रोड परिसर, उपनगर पगारे मळा. प्रभाग क्रमांक २३ मधील अशोका मार्ग, हिरे नगर, टागोर नगर, डीजीपी नगर व गांधनीगर जलकुंभ परिसर, प्रभाग क्रमांक १६ मधील आंबेडकर नगर, सिध्दार्थ नगर, शिवाजीनगर परिसर, उत्तरा न गर, बोधलेनगर, गायत्रीनगर, अयोध्यानगर. प्रभाग क्रमांक २३ मधील कल्पतरुनगर, हॅपी होम कॉलनी, व बजरंगवाडी आदी भागात पाणी पुरवठा होणार नाही. त्याच प्रमाणे शुक्रवारी (ता. २३) सकाळचा पाणी पुरवठा कमी दाबाने होणार अल्याचे पाणी पुरवठा विभागाकडून कळविण्यात आले आहे. 

हेही वाचा > क्रूर नियती! नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी देवीभक्ताचा दुर्देवी अंत; कुटुंबियांचा आक्रोश

हेही वाचा > मध्यरात्रीस खेळ चाले! गायींना भुलीचे औषध देऊन तस्करी; महागड्या गाड्यांचा वापर 

loading image