नाशिक : मनपात समित्यांचे कामकाज गुंडाळले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nashik Municipal Corporation
नाशिक : मनपात समित्यांचे कामकाज गुंडाळले

नाशिक : मनपात समित्यांचे कामकाज गुंडाळले

नाशिक : महापालिका निवडणुकीची घोषणा लांबणीवर पडत असताना एक-एक करून विषय समित्यादेखील बरखास्त होत आहे. येत्या वीस जानेवारीला शिक्षण समितीची मुदत संपुष्टात येत असल्याने पुढे निवडणूक घेतली जाणार नाही. त्यामुळे घटनात्मक पदे वगळता सर्व विषय समित्या गुंडाळल्या जाणार आहे.(Nashik Municipal Corporation)

हेही वाचा: पुणे : कोरोना बाधित ८० टक्क्यांहून अधिक रुग्णांचे घरीच विलगीकरण

२०१७ मध्ये सहाव्या पंचवार्षिकची निवडणूक पार पडली. मार्च २०२२ मध्ये मुदत संपुष्टात येणार आहे. त्यापूर्वी दरवेळी जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आचारसंहितेची घोषणा होते, परंतु यंदा अद्यापपर्यंत प्रारूप प्रभागरचनादेखील घोषित झालेली नाही. त्यामुळे निवडणुका साधारण महिनाभर पुढे ढकलल्या जातील, अशी शक्यता आहे. निवडणुकांचा कार्यक्रम निश्‍चित नसल्याने विषय समित्यांचे कामकाज मुदतीपूर्वीच गुंडाळले जात आहे.(Nashik neews)

हेही वाचा: शेतकऱ्यांच्या खात्यात 'एफआरपी' चे 8299 कोटी जमा

नोव्हेंबर महिन्यात महिला व बालकल्याण समिती, आरोग्य व वैद्यकीय, शहर नियोजन व विधी समित्यांची मुदत संपुष्टात आल्यानंतर विभागीय अधिकाऱ्यांकडे सभापती, उपसभापती निवडीचा कार्यक्रम पाठविण्यात आला. परंतु, अद्यापपर्यंत प्रतिसाद न मिळाल्याने या समित्यांचे कामकाज गुंडाळले आहे. निवडणुकीची प्रशासकीय तयारी सुरू झाल्याने आता नवीन पंचवार्षिकमध्येच समित्या अस्तित्वात येतील. २० जानेवारीला शिक्षण समितीची मुदत संपुष्टात आल्यानंतर ही समितीदेखील गुंडाळली जाणार आहे.

हेही वाचा: पुणे : चंदन तस्करी प्रकरणात एकास पकडले

महापौर, स्थायीचा पूर्ण कार्यकाळ

१५ मार्चला महापौरांची मुदत संपुष्टात येणार आहे. त्यापूर्वी १ मार्चला महापौरपदाचा कार्यकाळ संपुष्टात येणार असल्याचे पत्र महापौर कार्यालयाला सादर केले जाणार आहे. निवडणुका न झाल्यास प्रशासकीय राजवट लागू होईल. निवडणुका लांबणीवर पडत असल्याने महापौर, उपमहापौरांना सत्तेचा पूर्ण कार्यकाळ मिळणार आहे. स्थायी समिती सभापतिपदाचा कार्यकाळ २८ फेब्रुवारीपर्यंत राहणार आहे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Nashik
loading image
go to top