esakal | युवा शेतकरी रोज भागवतोय शेकडो मुक्या जीवांची तहान

बोलून बातमी शोधा

young farmer work for animals

''त्यांना पण भूक-तहान आहेच की..'' युवा शेतकरी रोज भागवतोय शेकडो मुक्या जीवांची तहान

sakal_logo
By
राम शिंदे

सर्वतीर्थ टाकेद (जि. नाशिक) : येथील युवा शेतकरी व सर्पमित्र विजय बांबळे हे चार- पाच वर्षांपासून टाकेद परिसरातील करंजीचा ओहळ येथील खडकातील खोलगट व पसरट खड्ड्यात विहिरीचे पाणी टँकरच्या साहाय्याने आणून पाइपद्वारे सोडत आहे. या साठविलेल्या पाण्यामुळे टाकेद, अडसरे, चौराईवाडीतील जवळपास दीडशे शेळ्या यासह गाई, बैल, म्हैस यांच्यासह वन्य प्राण्यांची तहान रोजच्या रोज भागविली जात आहे.

दरवर्षी देतात सेवा....

प्रत्येक वर्षी मार्च, एप्रिल, मे व जून महिन्याच्या पहिल्या दोन आठवड्यापर्यंत बांबळे हे मुक्या प्राण्यांची तहान भागविण्यासाठी टँकरच्या साहाय्याने स्वखर्चातून करंजीच्या ओहळातील खड्ड्यात पाणी टाकत आहे. शेळीपालन करणाऱ्या शेतकऱ्यांकडून बांबळे यांचे कौतुक होत आहे. एकीकडे माणसांनाच पिण्यासाठी पाणी मिळत नाही, तर या मुक्या प्राण्यांना, पाळीव जनावरांसह पशूपक्ष्यांकडे कोणीही लक्ष देताना दिसत नाही. दुसरीकडे कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येमुळे प्रशासन यंत्रणा पूर्णपणे हतबल झाले आहे. अशा कठीण परिस्थितीत स्थानिक प्रशासनाकडून मुक्या प्राण्यांना चारा छावणी, पिण्याचे पाण्याची सुविधा होत नसताना बांबळे यांचे सर्व स्तरातून कौतुक होताना पाहायला मिळत आहे.

हेही वाचा: लस दोनदा घेतली... मी जिवंत आहे बघा!

''दुष्काळी परिस्थितीत मुक्या प्राण्यांकडे कोणीही लक्ष देत नाही. मुक्या प्राण्यांची तहान भागविण्यासाठी गेल्या चार वर्षांपासून स्वतः हा उपक्रम राबवत आहे, असेच उपक्रम सर्वांनी राबवायला हवेत.''

- विजय बांबळे, टाकेद

हेही वाचा: "खडसेंचे मानसिक संतुलन बिघडले" गिरीश महाजन यांची टिका