Nashik News : शेळीला वाचवणे प्राणावर बेतले; शेततळ्यात बुडून तरुणाचा मृत्यू

पाण्यात बुडणाऱ्या शेळीला वाचवले, परंतु या तरुणाला तळ्यातील शेवाळामुळे स्वतःचा जीव वाचवता आला नाही.
Youth dies after drowning in farm nashik news
Youth dies after drowning in farm nashik newsesakal

सिन्नर : चारण्यासाठी सोडलेल्या शेळीचे बकरू शेततळ्यात घसरून पडल्यावर त्याला वाचवण्यासाठी तळ्यात उतरलेल्या अठरा वर्षे तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास सिन्नर तालुक्यातील वावी येथे घडली.

पाण्यात बुडणाऱ्या शेळीला वाचवले, परंतु या तरुणाला तळ्यातील शेवाळामुळे स्वतःचा जीव वाचवता आला नाही. (Youth dies after drowning in farm nashik news)

सुमारे दीड तासांच्या प्रयत्नानंतर स्थानिक तरुणांनी टायरच्या साह्याने पाण्यात उतरून या तरुणास बाहेर काढले. मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. अभिजीत अनिल काळोखे असे मृत तरुणाचे नाव आहे. वावी-पारेगाव रस्त्यालगत शेतात तो आई-वडिलांसोबत वास्तव्यास होता.

नेहमीप्रमाणे शेळ्या चालण्यासाठी सोडल्यावर तो वडिलांना शेतात मदत करत होता. त्यादरम्यान काही शेळ्या समोरच असलेल्या आसिफ शेख यांच्या शेततळ्याकडे गेल्या. अभिजीतने त्या शेळ्या येथून हूसकावल्या. मात्र, एका शेळीचे बकरू कुंपण ओलांडून थेट तळ्यावर गेले व ते पाण्यात घसरून पडले. सध्या वापरत नसलेले सुमारे एक एकर क्षेत्रातील हे तळे पाण्याने अर्धे भरलेले होते.

बकराला वाचवण्यासाठी अभिजीतने स्वतःचा शर्ट काढून झाडाच्या बुंध्याला बांधला व त्याला पकडून त्याने पाण्यात बुडणाऱ्या बकराला बाहेर काढले. याच दरम्यान तळ्यातील पाण्यात असलेल्या शेवाळावरून पाय घसरून तो पडला. त्याच्या कुटुंबियांच्या समोर हा सर्व प्रकार घडत होता. त्यांनी आरडाओरड करून आजूबाजूच्या शेतातील शेतकऱ्यांना मदतीसाठी बोलावले.

मात्र तळ्यात शेवाळ अधिक असल्याने तो पाण्यात बुडाला. ही घटना समजल्यावर वावी गावातील शेकडो तरुण मदतीसाठी धावले. पोहता येणाऱ्यांनी पाण्यात उड्या मारल्या. मात्र तासभर प्रयत्न करूनही त्याचा थांगपत्ता लागत नव्हता. या दरम्यान वावी पोलीस ठाण्यातून परिसरातील पट्टीच्या पोहणाऱ्या तरुणांना निरोप देण्यात आले. मात्र, कोणीही उपलब्ध होऊ शकले नाही.

Youth dies after drowning in farm nashik news
Nashik Accident News: कंटेनर-रिक्षाच्या अपघातात महिला ठार; दोघे गंभीर

तहसीलदार सुरेंद्र देशमुख यांना याबाबत कळवल्यावर त्यांनी सिन्नर नगरपालिकेतून बचाव पथक मदतीसाठी रवाना केले. तोपर्यंत ट्यूब ची मदत घेऊन पाण्यात उतरलेल्या तरुणांनी अभिजीतचा मृतदेह शोधण्यात यश मिळवले होते. मृतदेह पाण्याबाहेर काढून स्थानिक डॉक्टरांकडे नेण्यात आला.

तेथून दोडी येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन केल्यावर रात्री उशिरा वावी येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन लोखंडे, उपनिरीक्षक पाराजी वाघमोडे, सहाय्यक उपनिरीक्षक किरण सोनवणे, शरद दाते यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.

तळ्यात जमा झालेल्या गावांमध्ये असल्यामुळे अभिजीतला पाण्यात बुडाल्यावर बाहेर पडता आले नाही शोध घेणाऱ्या तरुणांना तो गाळात तोंड खूपसलेल्या अवस्थेत आढळून आला.

सामान्य कुटुंबातील असलेला अभिजीत आई-वडिलांना शेतीकामात मदत करण्यासोबतच गावात मंडप बांधण्याचे तसेच मिळेल ते काम करून हातभार लावत होता. त्याच्या दुर्दैवी मृत्यू गावातील तरुणांना चटका लावणारा ठरला.

Youth dies after drowning in farm nashik news
Nashik Crime News: सातपूरच्या 50 रोडरोमिओंवर कारवाई

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com