Nashik Accident News: मुंढेगाव फाट्यावर अपघातात तरुण ठार; ग्रामस्थांचे रास्ता रोको

car and two wheeler accident one killed and one injured traffic police hospital
car and two wheeler accident one killed and one injured traffic police hospitalSakal

Nashik Accident News : नाशिक-मुंबई महामार्गावरील मुंढेगाव फाट्यावर शनिवारी (ता. २) रात्री नऊच्या सुमारास ट्रकने पादचारी तरुणाला चिरडल्याने तो जागीच ठार झाला.

या घटनेमुळे ग्रामस्थांनी रास्ता रोको केल्याने नाशिक व मुंबईकडे जाणाऱ्या दोन्ही मार्गावर वाहनांच्या दोन किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या होत्या. (Youth killed in an accident on Mundhegaon Phata nashik news)

या घटनेमुळे संतप्त ग्रामस्थांनी रास्ता रोको केल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी आल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही, मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला. या अपघातात मृत झालेल्या तरुणाचे नाव अविनाश कैलास गतीर (वय २७) असून, तो मुंढेगाव येथील रहिवासी आहे.

ग्रामस्थांच्या रास्ता रोकोमुळे मुंढेगाव फाट्यापासून दोन्ही बाजूंना दोन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. या ठिकाणी यापूर्वीही अनेक अपघात होऊन शेकडो निष्पाप नागरिकांचा बळी गेला आहे. यामुळे वरिष्ठ पोलिस प्रशासन, महामार्ग प्रशासन, महसूल अधिकारी आणि संबंधित यंत्रणा घटनास्थळी आल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याचा पवित्रा संतप्त आंदोलकांनी घेतला.

car and two wheeler accident one killed and one injured traffic police hospital
Nashik Accident News: ट्रकखाली चिरडून महिला मृत्युमुखी; नांदगाव- येवला रस्त्यावरील घटना, एक जण गंभीर

अपघात रोखण्यासाठी युद्धपातळीवर ग्रामस्थांनी सुचवलेल्या उपाययोजना कराव्यात. मृताच्या नातेवाइकांना नुकसानभरपाई द्यावी. पुलाची निर्मिती करावी आदी मागण्या करण्यात येत होत्या. मागण्या पूर्ण झाल्याशिवाय रास्ता रोको मागे घेणार नाही. मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी संतप्त भावना ग्रामस्थांमध्ये दिसून आली.

अपघाताला कारणीभूत ठरणार ट्रक (एमपी १३ एच-०३४९) आणि चालकाला ग्रामस्थांनी ताब्यात घेतले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन ग्रामस्थांची समजूत काढण्याचा प्रयत्न करीत असल्याने हे आंदोलन रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

car and two wheeler accident one killed and one injured traffic police hospital
Nashik Accident News: महामार्गाच्या सर्व्हिसरोडवर पादचारी अन त्र्यंबकरोडवर वाहनाच्या धडकेत महिला ठार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com