थरारक! मित्राची बहिण आवडायची म्हणून केले प्रपोज..अखेर झालाच तो खुलासा!

love crime 1.jpg
love crime 1.jpg

नाशिक रोड : अजय जाधवच्या बहिणीला सागरने प्रपोज केले होते. ही बाब तिने आपल्या मित्राला कळविली. भाऊ अजयला हे समजल्यावर तोही संतापला. त्याने शनिवारी सायंकाळी राकेश घुमरे व राहुल राहटळ यांना बरोबर घेतले. सागरला बरोबर घेऊन तिघेही श्रीहरी लॉन्सजवळील गोदापात्रात झुडपात गेले..अन्...

सायंकाळी पोलीस ठाण्यात वाजला फोन.. अन् 

शनिवारी सायंकाळी पाचच्यादरम्यान उपनगर पोलिस ठाण्यात एका व्यक्तीने फोनवर पोलीसांना माहिती दिली. उपनगर पोलिसांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. शोध घेतल्यास त्यांना चांगलाच धक्का बसला. जेल रोडला दसक येथील गोदावरीतीरी असलेल्या आढाव मळ्यातील हरी लॉन्स परिसरातील सात आंबे भागात एक युवक मृतावस्थेत असल्याची माहिती पोलिसांना दिली. उपनगर पोलिसांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. मृताच्या गळ्यावर तीक्ष्ण हत्याराने वार केल्याचे पुढे आले.

अखेर झाला खुलासा
पोलीसांच्या माहितीनुसार अजय जाधवच्या बहिणीला मृत सागरने प्रपोज केले होते. ही बाब तिने आपल्या मित्राला कळविली. भाऊ अजयला हे समजल्यावर तोही संतापला. त्याने शनिवारी सायंकाळी राकेश घुमरे व राहुल राहटळ यांना बरोबर घेतले. सागरला बरोबर घेऊन तिघेही श्रीहरी लॉन्सजवळील गोदापात्रात झुडपात गेले. तेथे सर्वांनी मद्यपान केले. तिघेही सागरचे मित्र होते. त्यामुळे सागर निश्‍चित होऊन या तिघांसोबत गेला. तेथे तिघांनी मद्यपान केले. तेथे लपवलेल्या कोयत्याने तिघांनी सागरच्या मान, डोक्‍यावर वार करून तेथून पलायन केले होते.  

मित्रांनी केला घात

पोलिसांनी जेल रोड भागातील अजय दीपक जाधव (वय 21) आणि राहुल रहाटळ (दोघेही रा. भगवा चौक) यांना अटक केली. तर मुख्य सूत्रधार राकेश घुमरे फरारी होता. मध्यरात्री उशिरा त्याच्या मुसक्‍या आवळण्यात पोलिसांना यश आले. दरम्यान, मृत सागर अहिरे आणि त्याच्या खूनप्रकरणी अटक केलेले संशयित हे सगळे जण एकाच भागातील असल्याने या घटनेला स्थानिक नगरातील मैत्रीमधील वाद की प्रेमप्रकरण यापैकी काय पार्श्‍वभूमी आहे. हे मात्र उशिरापर्यंत स्पष्ट झाले नव्हते.मृतदेह सापडला ती जागा नदीपात्रात असून, तेथे झाडी आहेत. त्यामुळे खून तेथेच झाला की खून करून मृतदेह नदीपात्रात फेकला, याची माहिती घेण्याचे काम सुरू होते. मृत सागरसह तिघे संशयित एकाच भागातील रहिवासी असून, ते परस्परांचे परिचित होते अशी माहिती उपायुक्त विजय खरात यांनी सांगितले. 

युवकाच्या खूनप्रकरणी तिघांना कोठडी 
जेल रोड येथील 19 वर्षांच्या युवकाच्या खून प्रकरणाचा शोध लावण्यात उपनगर पोलिसांच्या गुन्हे शाखेला यश आले आहे. पोलिसांनी खून झालेल्या सागर अहिरे याच्या तीन संशयित मित्रांना अटक केली. त्यांना नाशिक रोड न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. कोठडी मिळालेल्यांची नावे अजय दीपक जाधव (20), राकेश नाना घुमरे (19) आणि राहुल ऊर्फ रोमीओ राजेश राहटळ (21) अशी असून, ते सर्व जेल रोडच्या शिवाजीनगर परिसरातील रहिवासी आहेत. ते मृत सागरचे मित्र होते. दसक शिवारातील गोदावरी पात्रात श्रीहरी लॉन्सजवळ शनिवारी (ता.27) सायंकाळी पाचला खून झाल्याची माहिती अभिजित बनकर याने उपनगर पोलिसांना दिली होती. सुनील रोहोकले, सहाय्यक निरीक्षक संतोष खडके, के. टी. गोडसे, विलास गिते, किरण देशमुख, राहुल खांडबहाले यांनी तातडीने तपास करून अजय जाधव, राकेश घुमरे आणि राहुल ऊर्फ रोमिओ राजेश राहटळ या तिघांना अटक केली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com