Nandurbar News : नवापूर वन विभागाने लाकूड पकडले

Nawapur: Timber stock captured by Forest Department.
Nawapur: Timber stock captured by Forest Department.esakal

नवापूर : वन विभागाच्या पथकाने शनिवारी (ता.७) सायंकाळी अवैधरीत्या वाहतूक होणाऱ्या इंजयाली जळाऊ लाकूड पकडले. पाच घन मीटर इंजयाली जळाऊ लाकूड व आयशर असे अंदाजित चार ते साडेचार लाखाचा मुद्देमाल पकडला.

मात्र, वाहन चालक वाहन सोडून पळून गेला असल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितले आहे. (Navapur forest department caught wood Nandurbar News)

हेही वाचा : द मिसिंग टाइल सिंड्रोम ठेवा आपल्यापासून दूर

Nawapur: Timber stock captured by Forest Department.
Jalgaon News : सीएसटी- दोंडाईचा एक्सप्रेस आता भुसावळपर्यंत धावणार

नवापूर वनपरिक्षेत्र अधिकारी व वन विभागाचे पथक नवापूर ते घोडजामने रस्त्याने पेट्रोलिंग करताना सायंकाळी प्राप्त माहितीवरून इंजायली जळाऊ लाकडे भरून वाहतूक करताना दिसला. आयशर ट्रकला थांबविण्याचा इशारा केला.

चालक आयशर थांबवून अंधाराचा फायदा घेत पसार झाला. इंजायली जळाऊ मालासह आयशर (एमएच १८ एम ९५३२) जप्त केले.

सदर पकडलेला इंजयाली जळाऊ लाकूड पाच घन मीटर असून तपकिरी रंगाची आयशर असे अंदाजित चार ते साडेचार लाख एवढी किंमत आहे. वनपरिक्षेत्र अधिकारी स्नेहल अवसरमल, वनरक्षक विकास शिंदे, कमलेश वसावे, वाहन चालक दिलीप गुरव या पथकाने ही कारवाई केली.

Nawapur: Timber stock captured by Forest Department.
Nashik News : बोचरी थंडी अन्‌ धुक्‍याची दुलई

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com