Jogai Mata Navratrotsav : जोगाईमातेच्या नवरात्रोत्सवास कापडणेत उत्साहात प्रारंभ; भामरेसह 13 कुळांची कुलदेवता

जोगाईमातेच्या मंदिरावर नवरात्रोत्सवानिमित्त केलेली आकर्षक रोषणाई आणि सजावट. जोगाईमातेची विलोभनीय मूर्ती.
Jogai Mata Navratrotsav : जोगाईमातेच्या नवरात्रोत्सवास कापडणेत उत्साहात प्रारंभ; भामरेसह 13 कुळांची कुलदेवता

Jogai Mata Navratrotsav : तेरा कुळांसह राज्यातील भामरे कुळाची कुलदेवता जोगाईमाता मंदिरात नवरात्रोत्सवाला उत्साहात प्रारंभ झाला. जोगाईमाता विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष तथा उद्योजक अरुण पाटील यांच्या हस्ते घटस्थापना झाली.

पहिल्या माळेला जोगाईमातेची विधिवत पूजा करण्यात आली. जोगाईमाता विश्वस्त मंडळाचे सदस्य तथा माजी सरपंच सुरेश पाटील, सचिव जगन्नाथ पाटील, पी. बी. पाटील, अरविंद पाटील, पीतांबर पाटील, भाऊसाहेब पाटील, पुरोहित दुर्गेश जोशी, पांडुरंग पाटील आदी उपस्थित होते. (Navratri festival of Jogai Mata started in kapadane dhule news)

भात नदीच्या काठावर कुलस्वामिनी जोगाईमातेचे दाक्षिणात्य पद्धतीचे भव्य मंदिर आहे. माता तेरा कुळांची कुलस्वामिनी आहे. खानदेशसह गुजरात, नाशिक व मुंबई येथून वर्षभर भाविकांची वर्दळ असते. तेवीस वर्षांत जोगाईमाता विश्वस्त मंडळ भाविक, तसेच ग्रामस्थांच्या मदतीतून धार्मिकसह सामाजिक व शैक्षणिक भरीव काम करण्याचा प्रयत्न करीत आहे.

जोगाईमाता जागृत देवस्थान

जोगाईमातेचे भात नदीच्या काठावर दाक्षिणात्य पद्धतीचे ६१ फूट उंचीचे भव्य मंदिर आहे. देवीची प्रतिष्ठापना १२३२ मध्ये आबाजी व दादाजी पाटील यांनी केली होती. भामरे, जाधव, काळे, शेटे, ठाकूर, कापडणीस, देशमुख, राव, सूर्यवंशी, अहिरे, अहिरराव, अत्रे, शिंपी या तेरा कुळांची कुलदेवता आहे. चैत्र महिन्यातील चतुर्दशीला देवीची यात्रा भरते. खानदेशासह गुजरातमधून भाविक नवस फेडण्यासाठी येत असतात. नवरात्रोत्सवात हजारो भाविक हजेरी लावतात.

Jogai Mata Navratrotsav : जोगाईमातेच्या नवरात्रोत्सवास कापडणेत उत्साहात प्रारंभ; भामरेसह 13 कुळांची कुलदेवता
Saptashrungi Devi Gad : सप्तशृंगीदेवी मंदिराच्या गाभाऱ्यास चांदीतील नक्षीकामाचा नवा साज; 465 किलो चांदीचा वापर

सत्तावीस लाखांचा निधी मंजूर

मंदिराचा तीर्थक्षेत्र योजनेत समावेश झालेला आहे. सत्तावीस लाखांचा निधी मंजूर झाला आहे. निधीसाठी आमदार कुणाल पाटील व सामाजिक कार्यकर्ते अंजन पाटील यांचे प्रयत्न महत्त्वपूर्ण आहेत. तीर्थक्षेत्र व पर्यटन विकास योजनेतही समावेश झालेला आहे. मंदिरात देवीच्या दोन मूर्ती आहेत. मुख्य आसनावर अडीच फूट उंचीची मोठी मूर्ती आहे.

उजव्या बाजूकडील आसनावर स्वयंभू म्हटली जाणारी स्वयंभू लहान मूर्ती आहे. सभामंडपात देवीचे वाहन सिंहची व कासवाची मूर्ती आहे. महादेवाची पिंडी व नंदी विराजमान आहे. बोकडबळीची प्रथा ट्रस्टने मोठ्या प्रमाणात कमी केली आहे. वर्षभर विविध धार्मिक कार्यक्रमांसह सामाजिक उपक्रम सुरू असतात. दरम्यान, नवरात्रोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम सुरू झाले आहेत.

Jogai Mata Navratrotsav : जोगाईमातेच्या नवरात्रोत्सवास कापडणेत उत्साहात प्रारंभ; भामरेसह 13 कुळांची कुलदेवता
Navratri Festival : काळा कोट, कायद्यावर बोट..! महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना 'या' नवदुर्गा ठोठावताहेत शिक्षा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com