Dhule News : बिबट्या शोधण्यासाठी Droneसह Night कॅमेरे

Chimthane:- Forest ranger Kashinath Deore installing night cameras in an area where leopards roam. Ex-Chairman Darbarsinh Girase, Kapil Girase, Jitu Dhangar, Golu Patil and Forest Department staff are nearby
Chimthane:- Forest ranger Kashinath Deore installing night cameras in an area where leopards roam. Ex-Chairman Darbarsinh Girase, Kapil Girase, Jitu Dhangar, Golu Patil and Forest Department staff are nearbyesakal

चिमठाणे : येथील गावशिवारात गेल्या तीन दिवसांपासून बिबट्यांची मादी व दोन बछडे यांनी धुमाकूळ घातल्याने गुरुवारी (ता. २९) सकाळी साडेअकराच्या सुमारास शिंदखेडा वनविभागाने ड्रोनसह नाइट कॅमेरे गावशिवारातील उसाचे व पपई शेतावर फिरवला मात्र जास्त दाटीने ऊस लागवड केल्याने काही दिसून आले नाहीत.

तीन नाइट कॅमेरे झाडांना लावण्यात आले आहेत. कॅमेरेत बिबट्या आढळल्यास शुक्रवारी (ता.३०) पिंजरा लावण्यात येणार आहे. (Night Cameras with Drone to find Leopards Efforts of Forest Department Dhule News)

Chimthane:- Forest ranger Kashinath Deore installing night cameras in an area where leopards roam. Ex-Chairman Darbarsinh Girase, Kapil Girase, Jitu Dhangar, Golu Patil and Forest Department staff are nearby
Nashik News : कलगी-तुरा मधील ‘झिलक्या’ पात्र साकारणारे यशवंत बाबा; वयाच्या सत्तरीत आवाज खणखणीत!

येथील निशाणे रस्त्यालगतच्या गावशिवारात मंगळवारी (ता.२७) रात्री आठच्या सुमारास गहू पिकासाठी पाणी देण्यासाठी दुचाकीवर सीधा पावरा जात असताना अचानक बिबट्याने हल्ला केला होता. त्यात ते जखमी झाले होते.

सीधा पावरा यांच्यावर बिबट्याच्या बछड्याने दुसऱ्यांदा हल्ला केला. त्या ते पुन्हा जखमी झाले आहे. त्यांच्यावर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉ. शीतल सूर्यवंशी यांनी प्राथमिक उपचार केल्यानंतर धुळे येथील हिरे मेडीकल कॉलेजला त्यांना पाठविण्यात आले.

हेही वाचा : क्रेडिट कार्ड वापरताय...मग या गोष्टी माहिती हव्याच....

Chimthane:- Forest ranger Kashinath Deore installing night cameras in an area where leopards roam. Ex-Chairman Darbarsinh Girase, Kapil Girase, Jitu Dhangar, Golu Patil and Forest Department staff are nearby
Jalgaon News : पिता-पुत्रावर प्राणघातक हल्ला

डॉ. किशोर पाटील यांच्या शेतातील उसात बिबट्यांचा शोध घेण्यासाठी शिंदखेडा वनविभागाचे प्रभारी वनक्षेत्रपाल काशिनाथ देवरे, वनपाल मंडलिक, वनपाल जगदीश पाटील, वनरक्षक भरत बोरसे, वनरक्षक पठाण, वनमजूर जितू गिरासे व इब्राहिम शहा यांनी घटनास्थळी भेट दिली.

ड्रोनने उसाचे व पपईच्या शेतात पाहणी केली असता उसाच्या शेतात बिबट्यांच्या पायाचे ठसे दिसले. यावेळी गावातील शिंदखेडा पंचायत समितीचे माजी सभापती दरबारसिंह गिरासे, नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य कपिल गिरासे, शेतकरी रमेश धनगर, गोलू पाटील, सुरेंद्रसिंह गिरासे आदींसह शेतकरी उपस्थित होते.

Chimthane:- Forest ranger Kashinath Deore installing night cameras in an area where leopards roam. Ex-Chairman Darbarsinh Girase, Kapil Girase, Jitu Dhangar, Golu Patil and Forest Department staff are nearby
Jalgaon News : विवाहितेने मृत्यूला कवटाळले

शेतीसाठी दिवसा वीजपुरवठा

चिमठाणे गावशिवारात गेल्या तीन दिवसापासून बिबट्याने धुमाकूळ घातल्याने शेतीसाठी रात्री नऊ ते सकाळी पाचपर्यंत विद्युतपुरवठा करण्यात येत होता. रब्बी हंगामातील गहू, मका, हरभरा आदी पिकांना पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांना रात्री जावे लागत होते. गुरुवारी येथील ३३/११ उपकेंद्रांचे अभियंता श्री. महाजन यांनी चिमठाणे फिटरचा दुपारी चारला विद्युत पुरवठा दिला आहे.

"चिमठाणे परिसरात गेल्या तीन दिवसापासून बिबट्याने धुमाकूळ घातल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारीवरून ड्रोन कॅमेराने पाहणी केली. त्यात बिबट्याचे ठसे आढळून आले. तीन नाइट कॅमेरे झाडांना लावण्यात आले आहेत. कोणीही शेतकरी व ग्रामस्थांनी जो पर्यंत बिबट्या जेरबंद होत नाही तोपर्यंत रात्री शेतात जाऊ नये."

काशिनाथ देवरे, प्रभारी वनक्षेत्रपाल, शिंदखेडा

Chimthane:- Forest ranger Kashinath Deore installing night cameras in an area where leopards roam. Ex-Chairman Darbarsinh Girase, Kapil Girase, Jitu Dhangar, Golu Patil and Forest Department staff are nearby
Nashik News : कलगी-तुरा मधील ‘झिलक्या’ पात्र साकारणारे यशवंत बाबा; वयाच्या सत्तरीत आवाज खणखणीत!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com