विवाहीता विनयभंग प्रकरण...नऊ वर्षे होती 'ती' न्यायाच्या प्रतिक्षेत..अखेर..

woman affraid.jpg
woman affraid.jpg
Updated on

नाशिक : सिडको परिसरात राहणाऱ्या परप्रांतीय विवाहितेचा विनयभंग केल्याप्रकरणी आरोपीला तीन महिन्यांचा कारावास आणि एक हजार रुपये दंडाची शिक्षा मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी ठोठावली. विशेषत: आरोपीने वय आणि आजाराचे कारण देत शिक्षेत सवलत देण्याची मागणी केली असता, न्यायालयाने ती फेटाळली. 

अशा गोष्टींमुळे नराधमांचे फावते.....
निकेश शाह (वय 53, अश्‍विननगर, सिडको) असे आरोपीचे नाव आहे. ही घटना 10 सप्टेंबर 2010 ला घडली होती. पीडित विवाहिता फ्लॅटसमोरील पॅसेजमधील लाइट लावण्यासाठी गेली असता, त्याच वेळी वरच्या फ्लॅटमध्ये राहणारा आरोपी निकेश याने पीडितेला एकटी पाहून तिच्याशी गैरवर्तन व अश्‍लील चाळे केले होते. या प्रकरणी पीडिता पतीसमवेत अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी गेली, मात्र पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही. त्यामुळे पीडितेने तत्कालीन पोलिस आयुक्तांकडे धाव घेत तक्रार केली. आयुक्तांनी अंबड पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्यानंतरही ठाणे अंमलदाराने केवळ अदखलपात्र नोंद केली. त्यामुळे पीडितेने वारंवार विचारणा केल्यानंतर तीन महिन्यांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्या वेळी तपासी पोलिस बी. के. शेळके यांनी खोटा पंचनामा केला होता. त्याविरोधात पीडितेने पुन्हा पोलिस आयुक्तांकडे तक्रार केल्यानंतर आयुक्तांनी केलेल्या चौकशीतून कर्मचारी दोषी आढळल्याने एक हजाराचा दंड ठोठावला होता. या प्रकरणी दोषारोपपत्र न्यायालयात सादर करण्यात आले. 

...ही झाली आरोपीस शिक्षा

या प्रकरणी अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी बी. के. गावंडे यांच्यासमोर खटला चालला. सरकारी पक्षातर्फे ऍड. विद्या देवरे-निकम यांनी दोन साक्षीदार तपासले. यात आरोपी निकेश शाहविरोधात पुरावे सिद्ध झाल्याने न्यायाधीशांनी आरोपीस तीन महिने कारावास आणि एक हजार रुपयांची शिक्षा ठोठावली. पैरवी अधिकारी म्हणून सहाय्यक उपनिरीक्षक एस. एम. देशमुख यांनी कामकाज पाहिले. 

आरोपीची विनंती फेटाळली 
आरोपी शाह याने न्यायालयाकडे त्याचे व आजाराचे कारण देत शिक्षेमध्ये सवलत देण्याची विनंती केली होती; परंतु न्यायालयाने गुन्हा गंभीर असून, आरोपीला दया दाखविल्यास समाजामध्ये चुकीचा संदेश जाईल आणि त्यामुळे महिलांचे मनोधैर्य कमी होईल, असे मत व्यक्त केले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com