
Dhule : 19 व्या दिवशी शिक्षकांनी मागितली इच्छा मरणाची परवानगी
कापडणे (जि. धुळे) : राज्यातील शंभर टक्के अनुदानित कनिष्ठ महाविद्यालयातील (Junior College) प्रस्तावित वाढीव पदावरील शिक्षक गेल्या एकोणीस दिवसांपासून उन्हातान्हात आझाद मैदानावर हक्कासाठी आंदोलन करत आहेत. हा प्रश्न गेली पंधरा वर्ष प्रलंबीत असूनदेखील शिक्षण मंत्री (Education Minister) या प्रश्नावर कोणतीच कार्यवाही करताना दिसत नाही. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड (Educaion Minister Varsha Gaikwad) या राज्यातील शिक्षकांच्या प्रश्नावर गंभीर नाहीत. वेतन प्रश्न सोडवित नसाल तर इच्छा मरणाची परवानगी आंदोलनकर्त्या शेतकर्यांनी मागितली. (On 19th day teachers asked for permission to die Dhule News)
धुळे जिल्ह्यासह राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन वाढीव पदावरील शिक्षकांचे एकोणीस दिवसांपासून मुंबईतील आझाद मैदानावर वेतनासाठी आंदोलन सुरु आहे. गेल्या पंधरा वर्षांपासून वेळोवेळी आंदोलने सुरु आहेत. १७ नोव्हेंबर २०२१ ला काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या सोबत शिक्षण मंत्री याची बैठक झाली. बैठकीत वाढीव पदावर योग्य ती चर्चा होऊनसुद्धा विषय मार्गी लागलेला नाही. आता राज्यातील वाढीव पदावर काम करणारे अन शंभर टक्के अनुदानित कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक हक्काच्या न्यायीक मागणी साठी बेमुदत धरणे आंदोलनावर ठाम आहेत.
हेही वाचा: व्यथा ज्येष्ठांच्या : बँक, पोस्टात रांगा... 2-4 तास थांबा...
निवेदनात म्हटले आहे, शिक्षकांचा अंत पाहू नका. शिक्षकांची मनस्थिती व परिस्थिती खुप बिकट झालेली आहे. राज्यातील वाढीव पद शिक्षकांना तत्काळ मान्यता देऊन वेतन सुरू करावे. त्यांच्या जगण्याचे मनोबल वाढवून त्यांच्यावर विसंबून असलेले आई-वडील, पत्नी, मुले यांच्या संघर्षाचा काळ संपवावा. अन्यथा इच्छा मरणाची परवानगी द्यावी, अशी मागणी वाढीव पद कृती समितीचे अध्यक्ष प्रा.सचिन चव्हाण, प्रा.पंडीत सातपुते, प्रा.सागर भामरे, प्रा.अशोक हिंगे, प्रा.दत्तात्रय काळुखे, प्रा.ऋषिकेश कानवडे, प्रा.सचिन शेट्ये, प्रा.प्रज्ञा यादव, प्रा. केव पवार, प्रा.विनोद दानवे आदींनी केली आहे.
हेही वाचा: टंचाईग्रस्त भागात 401 टँकरने पाणीपुरवठा; टंचाईत यंदा 244 वाड्यांची भर
"संघटनेने विरोधी पक्षनेता प्रवीण दरेकर यांची भेट घेतली. त्यांना शिक्षकांची पंधरा वर्षांपासून असलेली स्थिती मांडण्यात आली. प्रश्न सोडविण्याचा आग्रह आंदोलनकर्त्या शिक्षकांनी मांडला."
- प्रा.सागर भामरे, धुळे
Web Title: On 19th Day Teachers Asked For Permission To Die Dhule News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..