Dhule News : भ्रष्ट कामाचा On The Spot पंचनामा; शिवसेनेचा मनपा कारभारावर पुन्हा वार

Dhule: Shiv Sena office bearers and workers demolishing the asphalt layer on the road between Gitanagar and Green Top
Dhule: Shiv Sena office bearers and workers demolishing the asphalt layer on the road between Gitanagar and Green Topesakal

धुळे : शहरातील देवपूर भागातील गीतानगर ते ग्रीन टॉपदरम्यान महापालिकेकडून झालेले रस्ता डांबरीकरण अत्यंत निकृष्ट झाले आहे. नुसत्या हाताने हा रस्ता उखडत आहे, असा आरोप शिवसेनेने केला. महापालिकेचा भ्रष्टाचार यातून उघड होत असल्याचा आरोप शिवसेनेने केला.

देवपूर भागातील गीतानगर ते ग्रीन टॉप भागातील रहिवाशांनी शिवसेनेचे महानगरप्रमुख धीरज पाटील यांना मोबाईलवरून रस्त्याबाबत तक्रार केली. (On the spot Panchnama of corrupt work Shiv Sena attack on municipal affairs again asphalt of new road removed Dhule News)

Dhule: Shiv Sena office bearers and workers demolishing the asphalt layer on the road between Gitanagar and Green Top
Jalgaon News : जळगावकरांना मिळणार बाजरीची खिचडी, पोहे अन्‌ पापडही; कृषी विभागाचा उपक्रम

या तक्रारीची दखल घेत श्री. पाटील यांच्यासह शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, उपजिल्हाप्रमुख किरण जोंधळे, महानगरप्रमुख डॉ. सुशील महाजन, भरत मोरे, कैलास मराठे, अण्णा फुलपगारे, छोटू माळी, संजय जवराज, विनोद जगताप, शुभम रणधीर आदींनी संबंधित रस्ताकामाची पाहणी केली.

या भागातील सुनील जैन, हेमंत पवार, राहुल चौधरी, अनिल रनाळकर, पंकज पाटील, शिवाजी पाटील, महेश भदाणे, नरेंद्र काळे, नीरज ठाकूर आदी नागरिक उपस्थित होते.

हाताने उखडले डांबर

एस्टिमेटप्रमाणे रस्त्याचे काम केलेले नाही. केवळ मातीच्या भरावावर डांबर ओतले गेले आहे. त्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठमोठे तडे गेले आहेत. हातानेच रस्ता उखडला जात आहे. दोन दिवसांतच रस्त्याची अशी अवस्था असेल तर पुढे काय, असा सवाल करत यावरूनच कामाचा दर्जा समजतो. दरम्यान, या भागातील पिण्याच्या पाइपलाइनचे लिकेजही काढलेले नसल्याचे शिवसेनेने म्हटले आहे.

हेही वाचा : या महामार्गामुळं खरंच येईल 'समृद्धी'?

Dhule: Shiv Sena office bearers and workers demolishing the asphalt layer on the road between Gitanagar and Green Top
Nashik News: फार्मसी पदवीच्‍या प्रस्‍तावास मंजुरी; आयुर्वेद महाविद्यालयासाठी जागेचा शोध : ॲड. ठाकरे

अधिकाऱ्यांना विचारणा

रस्त्याच्या या निकृष्ट कामाच्या अनुषंगाने मनपाचे अभियंता कैलास शिंदे यांच्याशी संपर्क साधून ठेकेदारावर कारवाईची मागणी केली. दरम्यान, या भागातील कनिष्ठ अभियंता पी. डी. चव्हाण यांनी जागेवर येऊन कामाची पाहणी करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आली. मात्र, श्री. चव्हाण यांनी संबंधित ठिकाणी येण्यास स्पष्टपणे नकार दिला. या संदर्भात धीरज पाटील यांनी मनपा आयुक्त देवीदास टेकाळे यांच्याशीही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र, त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नसल्याचे शिवसेनेतर्फे सांगण्यात आले.

कामावर लक्ष ठेवा

देवपूर भागातील सर्वच भागातील रस्त्यांची कामे बोगस, निकृष्ट दर्जाची होत आहेत. त्यामुळे नागरिकांनी काम सुरू असताना लक्ष ठेवून ते करून घ्यावे. बोगस कामे आढळल्यास शिवसेनेशी संपर्क साधावा, असे आवाहन महानगरप्रमुख धीरज पाटील यांनी केले आहे.

Dhule: Shiv Sena office bearers and workers demolishing the asphalt layer on the road between Gitanagar and Green Top
Viral News : धक्कादायक! कुत्र्याच्या भुंकण्यावरुन दोन कुटूंबात कडाक्याचं भांडण, हाणामारीत महिलेचा मृत्यू

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com