पाचोरा-जामनेर रेल्वे मार्ग "ब्रॉड गेज' होणार 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 फेब्रुवारी 2020

बहुचर्चित पाचोरा-जामनेर (पीजे) रेल्वे मार्ग मलकापूरपर्यंत वाढवून "ब्रॉडगेज' करण्यासाठी 
रेल्वेच्या अर्थसंकल्पात आर्थिक तरतूद झाली आहे.

पाचोरा ः गेली शंभर वर्षे अनेक अडचणींचा सामना करीत प्रवाशांना अतिशय कमी भाड्यात प्रवासी सेवा देणारी बहुचर्चित पाचोरा-जामनेर (पीजे) रेल्वे मार्ग मलकापूरपर्यंत वाढवून "ब्रॉडगेज' करण्यासाठी 
रेल्वेच्या अर्थसंकल्पात आर्थिक तरतूद झाली आहे. त्यामुळे हा रेल्वे मार्ग बंद होणार या अफवेला पूर्णविराम मिळाला आहे. 

शंभर वर्षे पार केलेल्या "पीजे' रेल्वे मार्गाचे "ब्रॉडगेज' करण्यासाठी खासदार रक्षा खडसे व खासदार उन्मेश पाटील यांनी सुरवातीपासूनच पाठपुरावा केला होता. त्याला यश आल्याने त्यांचे कौतुक होत आहे. 
पाचोरा येथून जामनेरपर्यंत सुमारे 56 किलोमीटरच्या रेल्वे मार्गाचे विस्तारीकरण करून तो मलकापूरपर्यंत वाढविण्यात यावा, या मागणीकडे खासदार उन्मेश पाटील यांनी रेल्वे मंत्री पियूष गोयल यांचे लक्ष वेधले होते. त्या अनुषंगाने सुमारे 850 कोटींची तरतूद करण्यात आल्याने हा रेल्वे मार्ग विस्तार दृष्टिपथात येणार आहे. 

आर्वजून पहा : अरे वा... भुसावळातून धावणार पाच तेजस गाड्या 
 

पीजे लाईनला शंभर वर्ष पूर्ण 
"पाचोरा- जामनेर' या नॅरोगेज मार्गावर धावणाऱ्या "पीजे' रेल्वेला नुकतीच शंभर वर्षे पूर्ण झाली. मुंबईच्या मे. शपुर्जी गोडबोले ऍण्ड कंपनीने या छोट्या रेल्वे मार्गाचे बांधकाम केले होते. 11जुलै 1998 ला पाचोरा ते पहूरपर्यंतच्या मार्गावर ही रेल्वेगाडी धावण्यास सुरुवात झाली. त्यानंतर वर्षभरात पहूर ते जामनेर मार्ग तयार झाला आणि पाचोरा- जामनेर मार्गावर पीजे रेल्वे धावू लागली. शेंदुर्णी येथून विड्याची पाने व जामनेर येथून केळी व धान्य पाठविण्यासाठी मालवाहतूक म्हणून या गाडीचा उपयोग केला जाऊ लागला. 

हेपण पहा : जळगाव शहरातील 21 "बीएलओं'वर कारवाई ? 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pachora marathi news Railway will be "Broad gauge"