Gram Panchayat Election: शिंदखेडा, शिरपूर, शहाद्यात माघारीनंतर चित्र स्पष्ट; सरपंच, सदस्यपदासाठी चुरस

A crowd of interested candidates gathered near the election decision officers for the retreat
A crowd of interested candidates gathered near the election decision officers for the retreatesakal

Gram Panchayat Election : ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी बुधवारी (ता. २५) माघारीची मुदत असल्याने याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. शिंदखेडा तालुक्यात सरपंचपदासाठी ४२, तर सदस्यपदासाठी १४५ उमेदवारांनी माघार घेतली.

शिरपूरला सरपंचपदाच्या ३७, तर सदस्यपदाच्या १६६ उमेदवारांची माघार घेतली. शहादा तालुक्यात सरपंचपदाच्या ३३, सदस्यपदाच्या ८३ इच्छुकांनी माघार घेतल्याने निवडणूक चुरशी होणार आहे. शिंदखेडा तालुक्यातील १३ ग्रामपंचायतींसाठी सार्वत्रिक निवडणूक होत असून, बुधवारी (ता. २५) माघारीची मुदत होती. (picture is clear after retreat in Shindkheda Shirpur Shahadat of gram panchayat election dhule news)

माघारीअंती पथारे व अंजनविहरे येथील निवडणूक बिनविरोध झाली, तर कुमरेज-परसामळ गटग्रामपंचायतीत नऊ सदस्य बिनविरोध झाले. मात्र सरपंचपदासाठी निवडणूक होत आहे. वाघोदे येथे एक सदस्य बिनविरोध झाला आहे.

तालुक्यातील १३ ग्रामपंचायतींसाठी सरपंचपदासाठी ७५ अर्ज वैध ठरले होते. माघारीअंती ४२ उमेदवारांनी माघार घेतली असून, ३३ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत, तर सदस्यपदासाठी ३५३ अर्ज वैध ठरले होते. १४५ उमेदवारांनी माघार घेतल्याने २०८ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

पथारे येथे सरपंचपदासाठी मंगला प्रमोद गोसावी, सदस्यपदासाठी रीमा महारू पवार, कल्पना चंद्रकांत जाधव, नंदूसिंह दादूसिंह गिरासे, इंदूबाई सरकार पवार, जितेंद्र लकडू भिल, सोनाबाई गणेश भिल व रमेश आजबसिंह जाधव बिनविरोध झाले आहेत. अंजनविहरे सरपंचपदासाठी अर्चना प्रभाकर पाटील, सदस्यपदासाठी भाहदू जंगा भिल, सुनीता निंबा मासुळे, योगिनी शरद पाटील, भावना सतीश पाटील, विजय भिवसन पाटील, कमलेश पदमोर, कुसुम भरत पदमोर व मनीषा सुरेश पाटील बिनविरोध झाले आहेत. वाघोदे येथील सदस्यपदी अधिकार हिंमत पाटील बिनविरोध झाले आहेत.

परसामळ-कुमरेज गटग्रामपंचायतीत सरपंचपदासाठी दुरंगी लढत होत असून, नऊ सदस्य बिनविरोध झाले आहेत. यशवंत बाबूलाल, रेखा विनोद भिल, केदार भटेसिंह गिरासे, लीलाबाई जगन भिल, ललिता दिनेश पाटील, कोमलसिंह भगवानसिंह गिरासे, अजय देवीदास भिल, कविता भिल, किरण प्रकाश कोळी बिनविरोध झाले आहेत.

A crowd of interested candidates gathered near the election decision officers for the retreat
Gram Panchayat Election : शेवटच्या दिवशी उमेदवारांची ‘भाऊगर्दी’; सदस्यपदासाठी 423 अर्ज

कदाणे येथे सरपंचपदासाठी दोन, तर सदस्यपदासाठी १८ उमेदवारी अर्ज, कंचनपूर सरपंचपदासाठी तीन अर्ज, सदस्यपदासाठी १९ अर्ज, वाडी सरपंचपदासाठी दोन अर्ज, तर सदस्यपदासाठी १४ अर्ज, वाघोदे येथे सरपंचपदासाठी दोन अर्ज, सदस्यपदासाठी १६ अर्ज, मांडळ येथे सरपंचपदासाठी तीन तीन, तर सदस्यपदासाठी १८, होळ (प्र. बेटावद) येथे सरपंचपदासाठी दोन व सदस्यपदासाठी २३ व गव्हाणे-शिराळे सरपंचपदासाठी दोन अर्ज, तर सदस्यपदासाठी १९ अर्ज शिल्लक आहेत. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी चिन्हवाटप करण्यात आले.

तालुक्यातील १५ ग्रामपंचायतींसाठी सुरू असलेल्या निवडणूक प्रक्रियेत बुधवारी (ता. २५) सरपंचपदाच्या स्पर्धेतून ३७, तर सदस्यपदासाठी इच्छुकांपैकी १६६ उमेदवारांनी माघार घेतली. त्यामुळे दोन ग्रामपंचायती पूर्णत: बिनविरोध झाल्या. उर्वरित १३ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी ३७, तर सदस्यपदासाठी १९३ उमेदवार रिंगणात आहेत.

माघारीची अखेरची मुदत असल्याने बुधवारी तहसील कार्यालयात उशिरापर्यंत पॅनलप्रमुख आणि समर्थकांची मोठी गर्दी थांबून होती. व्यूहरचनेनुसार माघार घेणाऱ्या उमेदवारांना तहसील कार्यालयापर्यंत घेऊन येणे आणि परत नेण्यासाठी विशेष वाहनांची नियुक्ती पॅनल्सतर्फे करण्यात आली. माघारीवर मतैक्य न झालेल्या उमेदवारांची कान्याकोपऱ्यात मनधरणी सुरू होती. त्यांच्या मागण्यांना होकार मिळताच त्यांना सोबत घेऊन पॅनलप्रमुख निवडणूक कार्यालयात पोचत होते.

वाटाघाटी फिसकटताच संबंधित उमेदवार बाहेरच्या बाहेर पसार होताना दिसून आले. माघारीची मुदत संपताना गिधाडे आणि बभळाज येथील सरपंचपदासह सदस्यपदाच्या सर्व जागा बिनविरोध झाल्याचे निष्पन्न झाले. तरडी येथील सदस्यपदाच्या सर्व नऊ जागा बिनविरोध झाल्या असून, तेथे केवळ सरपंचदासाठी तीन जण रिंगणात आहेत.

A crowd of interested candidates gathered near the election decision officers for the retreat
Gram Panchayat Election : आता उमेदवारी मागे घेण्यासाठी मनधरणी; बंडखोरीमुळे स्थानिक नेते काळजीत

टेंभेपाडा येथे सरपंचपदासाठी सर्वाधिक सात, तर सदस्यपदासाठी ३२ उमेदवार रिंगणात आहेत. दुपारी निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना तहसीलदार महेंद्र माळी, निवासी नायब तहसीलदार अधिकार पेंढारकर यांच्या उपस्थितीत निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात आले. ५ नोव्हेंबरला मतदान, तर ६ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे.

ग्रामपंचायतनिहाय निवडणूक लढविणारे सरपंचपद व सदस्यपदाचे उमेदवार असे ः

उंटावद (२, १४), कुरखळी (३, १९), अंतुर्ली (५, २५), नांथे (२, १२), खामखेडा प्र. थाळनेर (२, १८), आमोदे (२, १९), ताजपुरी (३, १५), खर्दे बुद्रुक (२, २), वाडी खुर्द (२, २), लोंढरे (२, ८), तरडी (सरपंच ३), उमर्दा (२, २७), टेंभेपाडा (७, ३२).

शहादा तालुक्यात १६ सरपंचपदासाठी ६८ उमेदवार रिंगणात

तालुक्यातील १६ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी बुधवारी माघारीअंती सरपंचपदाच्या १६ जागांसाठी १०१ अर्ज प्राप्त होते. पैकी ३३ जणांनी माघार घेतल्याने ६८ अर्ज शिल्लक आहेत. सदस्यपदासाठी दाखल ३६६ अर्जांपैकी ८३ इच्छुकांनी माघार घेतल्याने २८३ अर्ज शिल्लक आहेत.

तसेच १० ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीत आठ ग्रामपंचायतींसाठी १५ अर्ज प्राप्त होते, पैकी तिघांनी माघार घेतल्याने १२ अर्ज शिल्लक आहेत. उमेदवारांना चिन्हवाटपाची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी दीपक गिरासे यांनी दिली.

A crowd of interested candidates gathered near the election decision officers for the retreat
Gram Panchayat Election: नीरा देवघर परिसरात निवडणूक बिनविरोध करण्याकडे कल

तालुक्यातील तिसऱ्या टप्प्यातील १६ ग्रामपंचायतींच्या लोकनियुक्त सरपंच, सदस्य व पोटनिवडणुकीतील दहा ग्रामपंचायतींसाठी सुरू असलेल्या निवडणुकीत बुधवारी माघार होती. सकाळपासूनच तहसील कार्यालयात कार्यकर्त्यांसह इच्छुकांची मोठी गर्दी होती. या वेळी नामांकन अर्ज माघार घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मनधरणीही केली जात होती. या वेळी घरून गाडीत बसून माघारीसाठी आणलेल्या इच्छुक उमेदवाराने मात्र ऐनवेळी नकार दिल्याने चांगलीच पंचायत निर्माण झाली होती.

तालुक्यातील १६ ग्रामपंचायतींसाठी गावनिहाय सरपंचपदासाठी दाखल अर्ज (कंसात सदस्यपदासाठी दाखल अर्ज) : आडगाव ४ (२५), कमरावद ६ (८), करजई २ (९), कर्जोत ३ (१४), कुढावद ५ (१७), गणोर ७ (३२), गोगापूर ७ (१५), जयनगर ३ (२४), दामळदा ३ (१५), प्रिंप्री २ (१६), बिलाडी त. सा. ५ (११), लक्कडकोट ६ (२२), लांबोळा ३ (१३), लोंढरे २ (१८), वाघोदा १ (७), विरपूर ९ (३७).

A crowd of interested candidates gathered near the election decision officers for the retreat
Gram Panchayat Election : ग्रामपंचायत पोटनिवडणुकीवर थेट बहिष्कार टाकणारे प्रल्हादपुर तालुक्यातील प्रथम गाव!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com