
Police Recruitment : ट्रान्सजेंडर उमेदवार तडवी यांना अखेर शारीरिक, मैदानी चाचणीची संधी प्राप्त
धुळे : जिल्हा पोलिस शिपाई भरती-२०२१ (police constable recruitment) अंतर्गत ट्रान्सजेंडर उमेदवार चांद सरबत तडवी यांची शारीरिक व मैदानी चाचणी घेण्याबाबत निर्देश प्राप्त झाल्यानंतर १७ मार्चला सकाळी सातला येथील पोलिस कवायत मैदानात उमेदवार चाँद सरवर तडवी यांची शारीरिक व मैदानी चाचणी घेण्यात आली अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक संजय बारकुंड यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली. (police constable recruitment Transgender candidate Tadvi finally gets chance for physical field test dhule news)
धुळे जिल्हा पोलिस शिपाई भरती-२०२१ ची प्रक्रिया २ ते ५ जानेवारी २०२३ दरम्यान घेण्यात आली. त्यावेळी ट्रान्सजेंडर उमेदवार चाँद सरवर तडवी यांनी ऑनलाइन अर्ज भरलेला होता व ते ५ जानेवारीला भरती प्रक्रियेसाठी उपस्थित होते.
मात्र, ट्रान्सजेंडर उमेदवारांच्या संदर्भात कोणत्याही मार्गदर्शक सूचना प्राप्त नसल्याने त्यांना पोलिस भरती प्रक्रियेत सामावून घेण्यात आले नव्हते. दरम्यान, महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाकडून १४ मार्च २०२३ ला ट्रान्सजेंडर उमेदवारांच्या बाबतीत अधिसूचना निर्गमित झाल्याने पोलिस महासंचालक प्रशिक्षण व खास पथके, मुंबई यांनी शासनाच्या अधिसूचनेप्रमाणे ट्रान्सजेंडर उमेदवारांची १७ मार्चला शारीरिक व मैदानी चाचणी पूर्ण करण्याबाबत निर्देश दिले.
हेही वाचा : ही चाळीस वर्षे जुनी बलाढ्य बँक ४८ तासात बुडालीच कशी?
त्यानुसार शुक्रवारी (ता.१७) सकाळी सातला येथील पोलिस कवायत मैदान येथे ट्रान्सजेंडर उमेदवार तडवी यांची भरती निवड मंडळ सदस्यांच्या समक्ष कागदपत्र पडताळणी, शारीरिक व मैदानी चाचणी घेण्यात आली असे पोलिस अधीक्षक श्री. बारकुंड यांनी प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे.