
Police Route March : पिंपळनेरला संवेदनशील भागात पोलिसांचा रूट मार्च
पिंपळनेर (जि. धुळे) : येथील पोलिस ठाण्यात रॅपिड ॲक्शन फोर्सतर्फे नागरिकांकडून गावातील स्थिती जाणून घेत शहरातील संवेदनशील भागात रूट मार्च (route march) काढण्यात आला. (Police route march in sensitive area to Pimpalner dhule news)
शहरातील पोलिस ठाण्यात सीआरपीएफच्या सी कंपनी १०२ बटालियन रॅपिड अॅक्शन फोर्स तलोजा नवी मुंबईचे एक दल पिंपळनेरला गुरुवारी (ता. १६) फॅमिली रायझेशनसाठी दाखल झाले होते. यावेळी रॅपिड अॅक्शन फोर्सचे एसीपी संजयकुमार चौहान यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपळनेरचे पोलिस उपनिरीक्षक पी. पी. सोनवणे, भाईदास मालचे, भूषण शेवाळे यांच्यासह शांतता, दक्षता कमिटी, हिंदू मुस्लिम बांधवांसोबत बैठक घेण्यात आली.
त्यात शहरातील हिंदू मुस्लिम समाजाचे ऐक्य जाणून घेत शहरातील संवेदनशील भागासह घोड्यामाळ, इंदिरानगर, रामनगर, गांधी चौक, मेन बाजार पेठ, गोपाल नगर, सटाणा रोड, बस स्टॅन्डमार्गे रूट मार्च काढण्यात आला. सीआरपीएफ दल याआधी शहरात २०१६-१७ मध्ये दाखल झाले होते.
हेही वाचा : ही चाळीस वर्षे जुनी बलाढ्य बँक ४८ तासात बुडालीच कशी?
रॅपिड अॅक्शन फोर्स १५ मार्च ते २१ मार्चपर्यंत धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून जिल्ह्यातील संवेदनशील स्थळे, अल्पसंख्याक वस्ती, पूर्वीच्या झालेल्या घटना आदींची माहिती घेऊन दिल्ली कार्यालयास पाठवतात. ज्याने आपत्कालीन स्थितीत लवकरात लवकर मदत पाठवण्यासाठी उपयोगी ठरते.