Water Supply | प्रत्येक गावाला मुबलक स्वच्छ पाणी मिळणार : डॉ. सुप्रिया गावित

Jal Jeevan Mission
Jal Jeevan Missionesakal
Updated on

नंदूरबार : ग्रामीण भागात प्रत्येक गावाला व गावातील प्रत्येक घरालाच नव्हे तर घरातील प्रत्येकाला मुबलक व स्वच्छ पाणी मिळालेच पाहिजे, यासाठी प्रशासनाने (Administration) शासकीय योजना प्रभावीपणे राबवावी, त्यासाठी जिल्हा परिषद पूर्णपणे मदत करेल, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित यांनी शनिवारी (ता. ४) केले. (President of Zilla Parishad Dr Supriya gavit statement about water supply nandurbar news)

नंदुरबार तालुक्यातील १८ गावांमध्ये जलजीवन मिशन कार्यक्रमाचे भूमिपूजन केले. त्या वेळी त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या, की राज्यातील प्रत्येक गावाला स्वच्छ पिण्याच्या पाणी मिळावे यासाठी जलजीवन मिशन योजना केंद्र सरकार आणि राज्य सरकारने सुरू केली आहे.

आदिवासी भागांसाठी राज्य सरकारातील आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्या खात्यातून आदिवासी भागांसाठी निधी दिला जात आहे. मात्र या योजनेत सर्वाधिक महत्त्वाची भूमिका जिल्हा परिषदेची आहे.

हेही वाचा : 'पठाण'..आणि २०२३ मधले बाॅलीवूड..कसे असतील दिवस

Jal Jeevan Mission
Nashik News : अखिल भारतीय बंजारा भाविकांचे ग्रामदैवत सतीदेवी सामतदादा यात्रोत्सवाला भाविकांची विक्रम गर्दी

त्यामुळे जिल्हा परिषदेंतर्गत या योजनेला चालना देण्याचे काम जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून आपण स्वतः केले आहे. जिल्ह्यातील प्रत्येक कुटुंबाला स्वच्छ पिण्याचे पाणी मिळावे, असा आपला प्रयत्न आहे.

भूमिपूजन झालेली गावे

धिराजगाव, फुलसरे, निमगाव, उमज, लहान उमज, वाघशेप, कोठडे, खटावड, देवपूर, नटावद, भावणीपड, लहान मालपूर, मालपूर, आर्डीतारा, पावला, मंगरूळ, भांगडा, टाकलीपादा या गावांत भूमिपूजन करण्यात आले.

नंदुरबार तालुक्यातील कोठली गट, गणाची आणि पावला गणाच्या गावांमध्ये भूमिपूजन झाले. या वेळी जिल्हा परिषद सदस्या राजश्री गावित, अर्चना गावित, पंचायत समितीचे माजी सभापती प्रकाश गावित, पंचायत समिती सदस्या मालती वळवी आणि परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.

Jal Jeevan Mission
Chhatrapati Shivaji Maharaj : सकल हिंदू समाजातर्फे मनपा प्रवेशद्वारात दुखवटा आंदोलन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com