Nandurbar News: समता विद्यालयात मुख्याध्यापकांनी फुलविली परसबाग; धानोरा परिसरात चर्चेचा विषय

परसबागेत विविध पक्षांचा रहिवास देखील वाढला आहे. पक्षांचा किलबिलाटाने अन् फुलांचा सुगंधाने शाळेचा दिवस सुरू होतोय
Principal Chandrasekhar Lokhande while inspecting the flower garden in Samata Vidyalaya area of ​​Dhanora.
Principal Chandrasekhar Lokhande while inspecting the flower garden in Samata Vidyalaya area of ​​Dhanora.

Nandurbar News : सहा महिन्याच्या अथक प्रयत्नाने शाळेतील टाकाऊ वस्तूंचा वापर व इतर साहित्य आणून धानोरा (ता. नंदूरबार) येथील समता विद्यालयाचे विद्यार्थी, शिक्षक आणि मुख्यध्यापक यांनी शाळेच्या आवारात सुंदर अशी परसबाग तयार केली. हिरवाईने नटलेली ही परसबाग परिसरात चर्चेचा विषय होऊन अनेकांसाठी सेल्फी पॉइंट बनली आहे. जो कोणी इथे येतो. तो लय भारी... म्हटल्याशिवाय राहवत नाही.

धानोरा येथील नंदुरबार तालुका विधायक समितीच्या समता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय आहे. येथे चंद्रशेखर लोखंडे मुख्याध्यापक आहेत. या शाळेचा परिसर मोठा आहे. शाळेकडे पडीक जमीन मोठ्या प्रमाणात आहे. (principal created garden in school premises nandurbar news)

संस्थेची कूपनलिका आहे. सर्व काही आहे मात्र केवळ परिश्रमाचा अभाव आहे. परिश्रम घेतल्यास येथे हिरवळ नक्कीच फुलले हाच ध्यास मनात ठेवून मुख्याध्यापक श्री. लोखंडे यांनी शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांच्या मदतीने शालेय आवारात सुंदर परसबाग तयार करण्यास सुरू केले. शाळेतील टाकाऊ वस्तू व रोपे, साहित्याचा वापर केला.

शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांच्या अथक प्रयत्नाने बघता बघता सुंदर अशी परसबाग फुलवली. त्यातून विद्यार्थ्यांना सकस, ताज्या भाज्या त्वरित उपलब्ध व्हाव्यात. लागवडीविषयी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष ज्ञान मिळावे, सांडपाण्याचे व्यवस्थापन व्हावे तसेच मशागत पासून लागवड, निगा व काढणीपर्यंत सर्व प्रक्रिया शाळेतील विद्यार्थ्यांसह कर्मचारी करताहेत.

भाज्यांचा भोजनात समावेश

आजमितीस परसबागेत टोमॅटो, कांदे, वांगी, मिरची, कोथिंबीर, गवार, पालक, दुधी, गिलके, दोडके, शेवगा व झेंडूची फुले, गुलाब यासह अनेक फळे, फुलांची लागवड करून परसबाग तयार केली आहे. या परसबागेतील ताज्या भाज्यांचा वापर माध्यान्ह भोजनात तर फुलांचा वापर शाळेत होणाऱ्या विविध कार्यक्रमात, सत्कार समारंभात होत आहे.

Principal Chandrasekhar Lokhande while inspecting the flower garden in Samata Vidyalaya area of ​​Dhanora.
Dhule News: बांधकामाच्या कचऱ्यापासून बनवले सिमेंट मोर्टार; शिरपूरच्या प्राध्यापकास पेटंट मंजूर

विशेष बाब म्हणजे यंदा दुष्काळ असूनही पाण्याची काटकसर करत मुख्याध्यापकांसह शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मोठ्या कष्टाने परसबाग फुलवली आहे.

सेल्फी पॉइंट आकर्षणाचा बिंदू

परसबागेत विविध पक्षांचा रहिवास देखील वाढला आहे. पक्षांचा किलबिलाटाने अन् फुलांचा सुगंधाने शाळेचा दिवस सुरू होतोय. ही परसबाग पाहण्यासाठी शिक्षण विभागाचे अधिकारी, कर्मचारी भेटी देत आहेत. मुख्याध्यापक चंद्रशेखर लोखंडे यांच्या संकल्पनेतून साकारलेली परसबाग विद्यार्थ्यांसाठी सेल्फी पॉइंट झाले आहे. हा सेल्फी पॉइंट सर्वांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू बनला आहे.

"विद्यार्थ्यांना कष्टाचे महत्व कळते. शेती संकटात आली असून नव्या पिढीमध्ये शेतीचे संस्कार रुजले पाहिजे. परसबागेतून निघणाऱ्या भाज्यांचा वापर माध्यान्ह भोजनात होत आहे. परसबाग फुलविण्यास संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत रघुवंशी, उपाध्यक्ष मनोज रघुवंशी, आदींचे सहकार्य लाभले आहे." - चंद्रशेखर लोखंडे, मुख्याध्यापक

Principal Chandrasekhar Lokhande while inspecting the flower garden in Samata Vidyalaya area of ​​Dhanora.
Nandurbar News: ‘कॉल बीफोर यू डिग’; खोदकाम करताय..? नोंदणी करा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com