"लॉजवर चल जाऊ" चक्क महिला पोलिसाला 'त्याने' हातवारे केले....पुढे...   

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 डिसेंबर 2019

पंचवटी कारंजा आणि रामकुंड परिसरात काही वासनांध लोकांनी साध्या वेशातील महिला पोलिसांकडे पाहून अश्‍लील हावभाव केले. तसेच महिला पोलिसाला हातवारे करून लॉजला जाऊ, असे बोलून अश्‍लील वर्तन केले. पण पुढे..

नाशिक : रात्री उशिरा महिलांसाठी असलेल्या सुरक्षित वातावरणाची पडताळणी करण्यासाठी नाशिक शहर पोलिसांतर्फे मध्यरात्री करण्यात आलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये रात्री बारा ते पहाटे पाचपर्यंत शहरातील विविध सार्वजनिक ठिकाणांवर साध्या वेशभूषेत महिला पोलिसांना उभे करण्यात आले आणि त्यांनी बरोबर वासनांध, टवाळखोर, सडकसख्याहरींची पोलखोल केली. पोलिसांच्या या कारवाईत चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. 

असा घडला प्रकार...

अंबड पोलिसांनीही दिव्या ऍडलॅब्ज परिसरात स्टिंग ऑपरेशन करून हेमंत शिवाजी वाघ (33, रा. पारिजातनगर), भरत अभिमन पाटील (33, रा. एकदंतनगर) व गणेश परशुराम वरुडे (31, रा. दत्तमंदिर रोड, सिडको) अशा तिघांविरोधात गुन्हा दाखल केला. या तिघांनीही साध्या वेशातील महिला पोलिसाला हातवारे करून लॉजला जाऊ, असे बोलून अश्‍लील वर्तन केले. पंचवटी कारंजा आणि रामकुंड परिसरात संशयित आशिष लक्ष्मीचंद अग्रहरी (30) आणि अक्षी अमीर इस्माइल अत्रम (45, दोघेही रा. पंचवटी) यांनी साध्या वेशातील महिला पोलिसांकडे पाहून अश्‍लील हावभाव केले. दोघांविरोधातही पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. 

हेही वाचा > मुलीची देहविक्री...भरपूर पैसा..असे स्वप्न आईवडिलांचे..पण...

दुसरीही अशीच घटना...
दुसऱ्या घटनेत पोलिस आयुक्‍त विश्‍वास नांगरे-पाटील यांनी स्टिंग ऑपरेशनचे आदेश दिले होते. याअंतर्गत शहरातील सार्वजनिक ठिकाणी उभ्या असलेल्या महिला पोलिसांभोवती साध्या वेशात अन्य पोलिस कर्मचारी उपस्थित होते. तसेच या घटनेचे चित्रीकरण (व्हिडिओ रेकॉर्डिंग) देखील सुरू होते. ठक्कर बझार बसस्थानकाबाहेर महिला पोलिस रिक्षाची वाट पाहत उभ्या होत्या. त्या वेळी कमलकुमार गिरधारीलाल खेमाणी (52, रा. चेतनानगर, इंदिरानगर) याने महिला पोलिसाजवळ जात, एकटक पाहून अश्‍लील वर्तन केले. महिला पोलिस तेथून दुसरीकडे जात असतानाही त्याने पाठलाग केला. त्यामुळे पोलिसांनी कमलकुमारला ताब्यात घेत त्याच्या विरोधात सरकारवाडा पोलिस ठाण्यात वियनंभगाचा गुन्हा दाखल केला. 

हेही वाचा > 

धरणावर फिरायला आलेले पर्यटक गाडीपाशी गेले..अन् गाडीत पाहिल्यावर धक्काच...कारण..

 शिक्षकाच्या खोलीतून वाफा बाहेर येत होत्या... त्यांनी खिडकीचा कप्पा उघडून पाहिला तर धक्काच!

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Protesting women campaign for women's safety Nashik Police Crime Marathi News