भीषण अपघात : धुळ्याहून कळवणकडे जाणारी बस रिक्षासह विहिरीत...

bus accident 1.jpg
bus accident 1.jpg

नाशिक : मालेगावकडून येणारी बस देवळा तालुक्यातील धोबीघाट मेशी गावाजवळ रिक्षा व बसचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली. यात मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली असल्याची शक्यता आहे. बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने ही घटना घडल्याचे समजते आहे. ही बस कळवण डेपोतील असून धुळे - कळवण निघाली होती.

अशी घडली घटना

मेशी येथे देशविदेश हाॅटेलजवळ महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बस एम एच ०६ सी ८४२८ उमराणा देवळा रस्त्यावर टायर फुटल्याने बसने अॅपे रिक्षा येसगाव (ता मालेगाव)  असून या रिक्षाला धडक देत रिक्षा सह बस विहिरीचे कठडा तोडून विहिरीत कोसळली. घटनास्थळी देवळा पोलीस दाखल झाले असून स्थानिकांच्या मदतीने मदतकार्य सुरु आहे. विहिरीत अधिक पाणी असल्याने अनेक प्रवाशी पाण्यात अडकले आहे. बसची मागची काच फोडून दोरखंडाच्या साहाय्याने जखमी प्रवाश्यांना बाहेर काढले जात आहे. रिक्षा व बसमध्ये नेमके किती प्रवाशी आहेत याबाबत अजूनही प्रश्न चिन्ह आहे.

बघ्यांची गर्दी

अपघात इतका भीषण होतो की काही मिनीटांमध्ये लोक जमा झाले. विहिरीत अधिक पाणी असल्याने नेमके रिक्षा व बसमध्ये किती प्रवाशी आहेत याची अजून माहीती नाही. क्रेनच्या साहाय्याने एसटी बस काढण्याचे काम सुरू आहे. जखमींमध्ये एकाच कुटुंबातील चौघेजणांचा समावेश आहे. यात आतापर्यंत वीस प्रवाश्यांना बाहेर काढण्यात आले. त्यांच्यावर देवळा ग्रामीण रुग्णालयात व स्थानिक खाजगी डॉक्टर टीम मदत कार्य करत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com