प्रामाणिकतेबद्दल पोलिसांनी केला रिक्षाचालकाचा सत्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rickshaw driver was felicitated by police for honesty

प्रामाणिकतेबद्दल पोलिसांनी केला रिक्षाचालकाचा सत्कार

धुळे : शहरात रिक्षाने जागृती सुरेश पाटील प्रवास करत असताना तीन तोळे दागिने असलेली पर्स त्या बसस्थानकावर उतरताना विसरल्या. नंतर रिक्षाचालक गणेश थोरात (रा. हमाल मापाडी, धुळे) घरी गेले. रिक्षात त्यांना पर्स दिसली. त्यांनी ती प्रथम प्रामाणिकपणे आझादनगर पोलिस ठाण्यात जमा केली. त्यासाठी रिक्षाचालक थोरात यांचा जिल्हा पोलिस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रासह सत्कार झाला.

हेही वाचा: धुळे : जनावरांची अवैध वाहतूक करणारे ताब्यात

दरम्यान, नागरिकांनी कोणत्याही स्वरूपाच्या गुन्ह्यांबाबत जिल्हा पोलिस अधीक्षकांशी कार्यालयीन क्रमांक अथवा मोबाईलवर संपर्क साधावा. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल, असे आवाहन प्रशासनाने केले.

हेही वाचा: मुरुमाची वाहतूक करणारे ट्रॅक्‍टर ताब्यात

Web Title: Rickshaw Driver Was Felicitated By Dhule Police For Honesty Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :DhulePolice felicitations
go to top