Dhule News : शेतकऱ्याचा नादच खुळा; शिंदे दांपत्याने उभारले 13 लाखांचे मंदिर!

temple
templeesakal

कापडणे (जि. धुळे) : शेतकऱ्याचा (Farmer) नादच खुळा असतो. त्याची भक्ती आणि कष्टाची शक्तीही मोठी असते. सध्या देशभरात ‘एक लोटा जल सब समस्याओं का हल’ नारा गावागावांत गुंजत आहे. (rupees 13 lakh temple built by Shinde couple in Dhanur dhule news)

आबालवृद्धांची महादेवाच्या पिंडीवर लोटाभर जल टाकण्यासाठी रीघ लागलेली असते. पण येथील शेतकरी देवीदास शिंदे व सुशीला शिंदे यांनी तब्बल १३ लाख खर्चून महादेवाचे मंदिर उभारले अन् प्राणप्रतिष्ठा सोहळाही मोठा थाटात झाला.

विशेष म्हणजे आमदार कुणाल पाटील यांनी मंदिरासमोर सभामंडप उभारून मंदिराचे भव्यत्व अधिकच वाढविले आहे.

धनूर येथील प्रगतिशील शेतकरी देवीदास शिंदे आणि त्यांच्या सौभाग्यवती सुशीला पाटील यांच्या संकल्पनेतून व व्यक्तिगत योगदानातून १३ लाखांतून ग्रामपंचायत चौकात महादेवाच्या भव्य मंदिराची उभारणी झाली आहे.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

temple
Dhule News : अनधिकृत बॅनरप्रश्‍नी अतिरिक्त आयुक्त ॲक्शन मोडवर

धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांनी आमदार निधीतून या मंदिरासमोरच १५ लाख रुपयांच्या निधीला मंजुरी देत शानदार सभामंडपांची उभारणी झाली आहे. ग्रामपंचायत चौकातील सौंदर्य भक्तिमय झाले आहे.

दरम्यान, महादेव मंदिर मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेनिमित्त कथा सप्ताह व महाप्रसाद कार्यक्रम झाला. यानिमित्ताने शिवपुराण कथा यज्ञही झाला.

temple
Namami Goda Project : सिंहस्थापूर्वी ‘नमामी गोदा’ प्रकल्प साकारणार! मलजलवाहिन्यांची GIS Mapping

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com