Dhule News : अक्कडसे वाळू घाटात पहिल्या दिवशी वादाची ठिणगी! ठेकेदाराकडून दबंगगिरी होत असल्याचा आरोप

अक्कडसे (ता. शिंदखेडा) येथील तापी नदीपात्रात येथील वाळू घाट मंजूर झाला असून आज शुक्रवारी (ता. १२) वाळू घाट सुरू झाला आहे.
Tehsildar Dnyaneshwar Sapkale, police sub-inspector Milind Pawar, police personnel etc. came to the spot due to a dispute between the contractor and angry villagers at Sand Ghat.
Tehsildar Dnyaneshwar Sapkale, police sub-inspector Milind Pawar, police personnel etc. came to the spot due to a dispute between the contractor and angry villagers at Sand Ghat.esakal

चिमठाणे : अक्कडसे (ता. शिंदखेडा) येथील तापी नदीपात्रात येथील वाळू घाट मंजूर झाला असून आज शुक्रवारी (ता. १२) वाळू घाट सुरू झाला आहे.

नदीपात्रात जेसीबी मशिनने उत्खनन करून दोन डंपरने डेपोपर्यंत वाहतूक करत असताना वाळू वाहतुकीसाठी ग्रामस्थांची वाहने लावण्यात यावी याकारणावरुन ग्रामस्थांनी वाळू काढण्यात विरोध केल्याने पहिल्या दिवशी ठेकेदार आणि ग्रामस्थांमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. त्यामुळे हा वाळू घाट सुरू होण्यापूर्वीच 'वादात' सापडला आहे. (sand ghat approved in Tapi riverbed at Akkadase Shindkheda started Friday 12 become controversial dhule)

अक्कडसे येथील तापी नदीवरील गट क्रमांक १२४ मधील ९३० लांबी, २८ रुंदी व ०.४६ खोली असे २६ हजार ४६ साठ्याचे क्षेत्रफळ असून एकूण चार हजार २०० ब्रास एवढा एकूण साठा मंजूर करण्यात आला आहे.

परभणी येथील अक्षद एजन्सीला २०२३-२४ साठी गाळ व गाळ मिश्रित घाटांचा ई-निविदेद्यारे लिलाव देण्यात आला आहे. ३० जून २०२४ पर्यंतच्या किंवा मंजूर साठ्याचे उत्खनन पूर्ण होईल. यापैकी जे आधी घडेल तोपर्यंतच्या कालावधीसाठी मंजूर करण्यात आला आहे.

नदीपात्रातून वाळूची डेपोपर्यंतची वाहतूक ट्रॅक्टर अथवा कमाल सहा टायरच्या (टिपर) मार्फत करणे बंधनकारक राहील, वाळू गटातून ते वाळू डेपोपर्यंत वाहतूक करणाऱ्या वाहनांना जीपीएस यंत्रणा बंधनकारक राहणार आहे.

अक्कडसे येथील वाळू घाट सुरु होताच ठेकेदाराने जेसीबी मशिनने उत्खनन व डंपरने वाळू वाहतूक करीत असताना दुपारी ग्रामस्थांनी घाटावर येत ठेकेदाराशी हुज्जत घालत प्रथम ग्रामस्थांच्या गाड्या वाहतुकीसाठी लावाव्यात अशी मागणी केली.

Tehsildar Dnyaneshwar Sapkale, police sub-inspector Milind Pawar, police personnel etc. came to the spot due to a dispute between the contractor and angry villagers at Sand Ghat.
Dhule News : जिल्हावासीयांची मदार 50 टक्के जलसाठ्यावर! अवकाळीनंतरही दिलासा नाही

यावरुन दोघांमध्ये वाद झाला. वादाची माहिती मिळताच तहसीलदार ज्ञानेश्वर सपकाळे, शिंदखेडा पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक मिलिंद पवार, महसूल कर्मचारी व पोलिस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाल्यानंतर ग्रामस्थांवर रात्री उशिराने गुन्हा दाखल करण्यात येण्याची शक्यता आहे.

ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट

अक्कडसे येथील वाळू घाटामुळे शेतकऱ्यांच्या पाण्याच्या पाइपलाइन फुटल्या आहे. यामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. यामुळे संतप्त ग्रामस्थांनी या वाळू घाटाला आता विरोध केला आहे.

"अक्कडसे येथील वाळू घाट शुक्रवारी सुरू करण्यात आला. ग्रामस्थांचे व ठेकेदार यांचे दोघांचे म्हणणे ऐकून घेतले . शिंदखेडा पोलिस ठाण्यात राञी उशीरापर्यत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती." -ज्ञानेश्वर सपकाळे, तहसीलदार, शिंदखेडा

"अक्कडसे येथील वाळू घाट ठेकेदार व ग्रामस्थांमध्ये वाद झाला असून चौकशीअंती ग्रामस्थांनवर गुन्हा दाखल करण्यात येईल." - मिलिंद पवार, उपनिरीक्षक शिंदखेडा पोलिस ठाणे.

Tehsildar Dnyaneshwar Sapkale, police sub-inspector Milind Pawar, police personnel etc. came to the spot due to a dispute between the contractor and angry villagers at Sand Ghat.
Dhule News : सव्वातीन हजारांवर अंगणवाडी कर्मचाऱ्यांना नोटिसा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com