एकतर दादागीरी.. वरून "या" सुरक्षारक्षकाने केले असे कृत्य ...

ज्ञानेश्वर मेढे : सकाळ वृत्तसेवा
रविवार, 24 नोव्हेंबर 2019

नाशिकचे कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी गेलेल्या शेतकरी, पत्रकारांसोबत पार्किंगमध्ये गाडी पार्क करण्याच्या किरकोळ कारणावरून इथल्या गार्डने दादागीरी, दमदाटी करीत शेतकऱ्यांच्या कानशीलात वाजवली. प्रदर्शन परिसरातील ढिसाळ पार्किंग सुविधेमुळे या ठिकाणी येणारे शेतकरी हैराण झाले आहेत. इथले पार्किंग इंचार्ज देखील या गार्डच्या वागणुकीला हैराण झाल्याचे समजते.

नाशिक : नाशिक येथील कृषी प्रदर्शन बघण्यासाठी  सध्या अनेक शेतकरी व नागरिक येत असतात. यावेळी काही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी सुरक्षारक्षक नेमण्यात आले आहेत. मात्र इथल्या सुरक्षारक्षकांकडूनच दमदाटी व दादागिरी होत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. 

 हेही वाचा > शरद पवारांकडे परतलेल्या आमदारांच्या 'या' विधानांमुळे गोंधळात भर 

गार्डच्या वागणुकीला हैराण

कृषी प्रदर्शन बघण्यासाठी गेलेल्या शेतकरी, पत्रकारांसोबत पार्किंगमध्ये गाडी पार्क करण्याच्या किरकोळ कारणावरून इथल्या गार्डने दादागीरी, दमदाटी करीत शेतकऱ्यांच्या कानशीलात वाजवली. प्रदर्शन परिसरातील ढिसाळ पार्किंग सुविधेमुळे या ठिकाणी येणारे शेतकरी हैराण झाले आहेत. इथले पार्किंग इंचार्ज देखील या गार्डच्या वागणुकीला हैराण झाल्याचे समजते. शेतकरी व पत्रकारांना उलट-सुलट सवाल करत गार्डने दमदाटी केली. जा काय करायचे ते करून घे, असे सांगत, बघून घेण्याची धमकीही दिली. या सर्व प्रकरणाची चौकशी केली असता एजंसी मालकाला कोण गार्ड आहे हेच माहिती नव्हते.

 हेही वाचा > VIDEO : चहाची तलफ लागली...एक मिस्ड कॉल अन् 'हा' हजर...

व्यवस्थापनाकडून माफी

व्यवस्थापकाकडे या प्रकरणी तक्रार केली असता त्यांनी शेतकऱ्यांना तीन तास ताटकळत ठेवले. हा  प्रकार घडल्यानंतर गार्ड पार्किंग सोडुन पसार झाला. या प्रकरणी शेतकरी यांनी संबधित गार्ड विरोधात तक्रार दाखल करण्याची मागणी केली आहे.यानंतर पार्किंग इन्चार्ज नितीन मराठे यांनी या प्रकरणी शेतकरी व पत्रकारांची माफी मागितली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: security guard hit farmer Nashik Marathi News