VIDEO : चहाची तलफ...एक मिस्ड कॉल अन् 'हा' हजर...

tea.jpg
tea.jpg

नाशिक : जिद्द आणि चिकाटीला मेहनतीची साथ मिळाली की मनुष्य निश्चितपणे आपल्या कामात यशस्वी तर होतोच.. परंतु रोजगार निर्मितीचे नवे दारे ही स्वतःच उघडतो.. याचे उत्तम उदाहरण म्हणजे अंदरसूल येथील चहावाला सोन्या !...गेल्या वर्षापासून वडिलांचे पितृछत्र हरपल्यानंतर आपले काका शाम सोनवणे यांच्या मदतीने गावातील मेनरोडवर छोटीशी चहाची दुकाने सुरू केली.

आधुनिक तंत्रज्ञानाची जोड... सोन्याने शोधला नवा रोजगाराचा मार्ग
आपल्या वडिलांप्रमाणे सोन्याची ही गावात ओळख असल्याने सोन्याने आधुनिक तंत्रज्ञानाची साथ घेत मिस कॉलवर चहाचा व्यवसाय सुरू केला. यासाठी गावातील जवळपास ७५ टक्के दुकानांमध्ये आपला मोबाईल नंबर देऊन दुकानदारांचा मोबाईल नंबर आपल्या मोबाईल मध्ये सेव्ह करून घेतला. त्यामुळे सोन्याचा चहा मोबाईलच्या माध्यमातून गावातील प्रत्येक दुकानात जाऊन पोहोचल्याने रोजची मागणी ही वाढली आहे. विशेष म्हणजे गावातील हॉटेलपेक्षा ही अगदी कमी वेळेत सोन्याचा मिस्ड कॉलवर दर्जेदार आणि चवदार चहा अगदी वाजवी दारात मिळत असल्याने दिवसेंदिवस चहाला मागणी वाढली ती केवळ सोन्याचे दिलेल्या फास्ट सर्व्हिस दिल्यामुळेच...कोणी नातेवाईक,मित्र आणि स्वतःलाच चहाची तलफ लागली आणि सोन्याला मिस कॉल दिला की तत्पर चहाची सेवा मिळते आणि आलेल्या नातेवाईकांना नवीन पद्धतीने चहा मिळत असल्याने या फास्ट सेवेचे कौतुक ही केले जाते. 

सोन्या आपल्या कुटुंबाचा आधारवड
स्वतःच्या कल्पतेने निर्माण केलेल्या नव्या रोजगाराच्या बळावर सोन्या आपल्या कुटुंबाचा आधारवड बनला आहे. विशेष म्हणजे आत्ता थंडीची चाहूल लागल्याने ग्राहक हीच आपली देवता मानून  सोन्याने दुधाच्या चहा बरोबर आता  'लेमन टी'च्या चहाची जोड देऊन ग्राहकांची असलेली मागणी सोयीनुसार अगदी कमी वेळेतच देत असल्याने लेमन टी च्या मागणीने ही जोरदार धरला आहे.

पाच मिनिटांत ग्राहकाला सेवा
"फोनवर चहाच्या ऑर्डरचा मिस्ड कॉल आला की नाव बघून फोन कट करून पाच मिनिटांत ग्राहकाला सेवा दिली जाते .यामध्ये कोणी पैसे कमी जरी दिले तरी आपली सेवा कायमस्वरूपी पुढे सुरू ठेवणे हीच सामाजिक सेवा असल्याने मी मानतो" - सुनील (सोन्या) देशमुख,चहावाला,अंदरसुल, नाशिक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com