esakal | जिल्हा परिषदेत शिवसेना विकास आघाडीसोबत 
sakal

बोलून बातमी शोधा

shiv-sena-ncp.jpg

जिल्हा संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी यांनी नाशिक जिल्हा परिषद शिवसेना सदस्यांची बैठक शासकीय विश्रामगृहावर घेत त्यात शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली. बैठकीत, जिल्हा परिषदेतील शिवसेनेची सदस्यसंख्या, सध्या कोणत्या पक्षाकडे सभापतिपद आहे, याची माहिती त्यांनी घेतली व महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी ठेवण्याचे आवाहन केले. 

जिल्हा परिषदेत शिवसेना विकास आघाडीसोबत 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक : जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची येत्या 2 जानेवारीला दुपारी एकला निवडणूक होणार आहे. जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेना-कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस यांची महाविकास आघाडी कायम असेल, अशी माहिती शिवसेनेचे संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी यांनी दिली. 

पुढील आठवड्यातील भुजबळ, राऊत यांच्या बैठकीकडे लक्ष 

जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. विद्यमान अध्यक्ष शीतल सांगळे, उपाध्यक्षा नयना गावित व विषय समितीच्या सभापतीची मुदत 20 डिसेंबरला संपल्याने जिल्हाधिकारी कार्यालयाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्या पार्श्‍वभूमीवर शिवसेनेची बैठक होऊन त्यात, शिवसेनेचे पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेना महाविकास आघाडीसोबत राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. नाशिकला जिल्हा संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी यांनी नाशिक जिल्हा परिषद शिवसेना सदस्यांची बैठक शासकीय विश्रामगृहावर घेत त्यात शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली. बैठकीत, जिल्हा परिषदेतील शिवसेनेची सदस्यसंख्या, सध्या कोणत्या पक्षाकडे सभापतिपद आहे, याची माहिती त्यांनी घेतली व महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी ठेवण्याचे आवाहन केले. 
 
हेही वाचा > पक्षातून फुटलेल्यांना पदे...अन् आम्हाला फक्त शिस्तीचे धडे काय? 

हेही वाचा > धरणावर फिरायला आलेले पर्यटक गाडीपाशी गेले..अन् गाडीत पाहिल्यावर धक्काच...कारण..

पक्षादेश सर्वांनी मान्य करायचा 
येत्या सोमवारनंतर राष्ट्रवादी नेते छगन भुजबळ व शिवसेना नेते संजय राऊत एकत्र बैठक घेऊन अंतिम निर्णय घेतील. त्यात ठरणाऱ्या महाविकास आघाडीचा जो निर्णय होईल तो पक्षादेश म्हणून सर्वांनी मान्य करावा, असे आवाहन केले. बैठकीला, शिवसेना जिल्हाप्रमुख सुनील पाटील, जिल्हा परिषद अध्यक्षा शीतल सांगळे, शिवसेना महानगरप्रमुख महेश बडवे, उपजिल्हाप्रमुख दीपक खुळे, जिल्हा परिषद सदस्य भास्कर गावित, शंकरराव धनवटे, बाळासाहेब क्षीरसागर, दीपक शिरसाट, सविता पवार, सुरेखा दराडे, रमेश बोरसे, नीलेश केदार, कावजी ठाकरे, वैशाली कुळे, वनिता शिंदे, कान्हेरे, छाया गोतरणे, सुरेखा दराडे, दीपक शिरसाट, नयना गावित, सविता पवार, ज्योती वागले, सुनीता पठाडे, रोहिणी गावित, राजेंद्र चारोस्कर, हरिदास लोकरे, कमल आहेर आदींसह जिल्हा परिषद सदस्य उपस्थित होते. 

हेही वाचा > शिक्षकाच्या खोलीतून वाफा बाहेर येत होत्या... त्यांनी खिडकीचा कप्पा उघडून पाहिला तर धक्काच!